केरळमध्ये उघडकीस आलेल्या सेक्स स्कँडल आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणाचे धागेदोरे आमदार निवासापर्यंत पोहचल्याचे उघड झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. मागील आठवड्यात या प्रकरणाचा सुत्रधार जयचंद्रन याला पकडण्यात आल्यानंतर पोलीस चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक बाबींचा उलगडा झाला आहे. केरळमधील हॉटेल्समध्ये वास्तव्याला असणाऱ्या अनिवासी भारतीय आणि राजकीय व्यक्तींच्या अनैतिक संबंधाच्या चित्रफिती बनवून ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचे काम जयचंद्रन आपल्या टोळीसह करत होता. अशाच एका अनिवासी भारतीयाकडे जयदेवच्या टोळीने ३ कोटी रूपयांची मागणी केली होती. मात्र, या माणसाने थेट कोची पोलिसांत तक्रार दाखल केल्यामुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी बुधवारी रात्री आमदार निवासाच्या परिसरात सापळा रचून जयचंद्रनला अटक केली.
केरळमधील काँग्रेसचे प्रदेश सचिव आणि माजी आमदार शरतचंद्र प्रसाद यांच्या शिफारशीवरून जयचंद्रन याला आमदार निवासात दहा रुपये प्रतिदिवस दराने सदनिका देण्यात आली होती.

Accused who absconded after killing arrested after 34 years
हत्या करून फरार झालेल्या आरोपीला ३४ वर्षांनी अटक; गुन्हे शाखा १ ची कारवाई
Pramod Patil, Vaishali Darekar
मनसेतून बाहेर पडलेल्या गद्दारांना कल्याण लोकसभेत मदत नाही, आमदार प्रमोद पाटील यांचा वैशाली दरेकरांना इशारा
istanbul fire
इस्तंबूलच्या नाईटक्लबमध्ये भीषण आग, २९ जणांचा होरपळून मृत्यू!
Dolly chaiwala in malvids video viral
Video : बिल गेट्सला चहा दिल्यानंतर मालदीवमध्ये फिरतोय डॉली चायवाला! मात्र नेटकरी झालेत नाराज…