GSEB class 10 SSC results 2017: गुजरात राज्याचा दहावी परीक्षेचा निकाल आज सकाळी ८ वाजता जाहीर झाला आहे. गुजरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (GSHSEB) gseb.org या वेबसाइटवर निकाल जाहीर झाला आहे.

दि. १५ मार्च ते २५ मार्च २०१७ दरम्यान या परीक्षा झाल्या होत्या. या परीक्षेसाठी राज्यातून ११,०२,६२५ विद्यार्थी बसले होते. विशेष म्हणजे यंदा तुरूंगातून १४२ जणांनी परीक्षा दिली होती.

विद्यार्थ्यांनी आपला निकाल पाहण्यासाठी खाली पद्धतीचा वापर करावा:
Step 1: मंडळाने दिलेल्या वेबसाइटवर जावे (बातमीत वेबसाइट दिली आहे)
Step 2: वेबसाइटच्या होमपेजवर जाऊन दहावीचा निकाल या नोटिफिकेशनवर क्लिक करावे
Step 3: नंतर तुमची माहिती भरून (परीक्षा क्रमांक) ती सबमीट करावी.
Step 4: निकाल डाउनलोड करून त्यांची प्रिंट काढावी.