अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांची २०१६ मधील अध्यक्षीय निवडणुकीसाठी उमेदवारी जवळपास पक्की झाली आहे, असे त्यांच्या प्रचारमोहिमेतील निकटवर्तीयांनी सांगितले. त्या नेमकी केव्हा उमेदवारी जाहीर करणार याबाबत ठाम माहिती नसली तरी त्यांची उमेदवारी लवकरच जाहीर होणार आहे असे सांगण्यात आले.  
    दरम्यान रिपब्लिकन पक्षाचे टेड क्रूझ (टेक्सास) व रँड पॉल (केंटुकी) यांनी अध्यक्षीय निवडणुकीच्या स्पर्धेत उडी घेतली आहे.
   आठवडाअखेरीस प्रचार केल्यानंतर श्रीमती क्लिंटन यांचे नाव संपूर्ण अमेरिकेत जोरात आहे. शनिवारच्या बातम्यानुसार श्रीमती क्लिंटन या ट्विटरवरून उमेदवारी जाहीर करतील, त्यानंतर  व्हिडिओ व इमेलवर त्यांची उमेदवारी जाहीर होईल. डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षीय उमेदवारात त्या आघाडीवर आहेत पण त्यांना मॅसॅच्युसेट्सच्या सिनेटर एलिझाबेथ वॉरेन व मेरीलँडचे माजी गव्हर्नर मार्टिन ओमॅली यांच्याकडून स्पर्धा आहे, त्यांना उमेदवारीसाठीची प्राथमिक फेरी  जिंकायची म्हटली तरी अनेक अडथळे आहेत.
    लिबियात बेंगझाई येथे हल्ल्यात अमेपिकी राजदूत ठार झाले होते त्यावेळच्या घटनांवर इमेल पाठवताना त्यांनी खासगी इमेलचा वापर करून गोपनीयतेचा भंग केला असा त्यांच्यावर आरोप आहे.