मणिपूर विधानसभेमध्ये तीन विधेयके संमत केल्याच्या विरोधात विद्यार्थी संघटनांनी पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागले असून कुटुंब कल्याणमंत्र्यांसह पाच आमदारांच्या घरांना आग लावण्यात आली. रात्री उशिरापर्यंत जमावाने जाळपोळ सुरूच ठेवली होती. जमावावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत. स्थानिक नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी मणिपूर विधानसभेने  तीन विधेयके मतदानाने संमत केली.
नागरिक संरक्षण विधेयक २०१५ याविधेयकामध्ये १९५१ पूर्वीपासून मणिपूरमध्ये राहणाऱ्यांना संरक्षण देण्यात आले आहे. तर त्यानंतर आलेल्यांना ‘निर्वासित’ असा शिक्का मारण्यात आला आहे. यामुळे १९५१ पूर्वीच्या नागरिकांना त्यांच्या मालमत्तेवर हक्क सांगण्याचा अधिकार आहे. तर इतरांना त्यांच्या ताब्यातील मालमत्ता केव्हाही परत द्यावी लागण्याची तरतूद करण्यात आली आहे.