अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेली राष्ट्रपतिपदाची निवडणूक अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. मात्र, आजवरच्या इतिहासावर नजर टाकल्यास यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) पारडे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधकांच्या तुलनेत जड असल्याचे मानले जात आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करता रालोआकडे विरोधकांपेक्षा साधारण १५ टक्के अधिक मते असल्याचे चित्र आहे.

राष्ट्रपतिपदासाठी खासदार (राष्ट्रपतीनियुक्त वगळून) आणि राज्याराज्यांचे विधानसभेतील आमदार हे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मतदार असतात. एकूण खासदारांची संख्या ७७६ आणि आमदारांची संख्या ४१२० इतकी आहे. १९७१ च्या लोकसंख्येच्या आधारावर खासदारांच्या आणि राज्याराज्यांतील आमदारांच्या मतांचे मूल्य ठरलेले असते. त्यानुसार एका खासदाराच्या मताचे मूल्य ७०८, पण आमदाराच्या मताचे मूल्य राज्यनिहाय बदलते. म्हणजे उदाहरणार्थ उत्तर प्रदेशातील एका आमदाराच्या मताचे मूल्य २०८ असते, महाराष्ट्रात १७५ असते, तर चिमुकल्या गोव्यात फक्त १८. ही सगळी मते धरून राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतील एकूण मतमूल्य १० लाख ९८ हजार ८८२ इतके भरते. त्यामुळे ही निवडणूक जिंकण्यासाठी ती ५ लाख ४९ हजार ४४२ मते मिळवणे आवश्यक असते. नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेसह राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे (एनडीए) एकूण ४ लाख ७४ हजार ३६६ मते होती. पण उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूरमधील विजयाने ही संख्या थेट सुमारे ५५ हजारांनी वाढून एकदम ५ लाख २९ हजार ३९८ मतांपर्यंत पोचली आहे. त्यामुळे आता एनडीएला राष्ट्रपतिपदाची निवडणूक जिंकण्यासाठी फक्त २० हजार मतांची गरज आहे.

mumbai high court on sawantwadi dodamarg wildlife corridor
विश्लेषण : सावंतवाडी-दोडामार्ग कॉरिडॉर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील? न्यायालयाचा आदेश काय? होणार काय?  
BJP, online advertisements, Phir Ek Bar,
‘फिर एक बार’साठी तीन महिन्यांत ३८ कोटींचा खर्च, ऑनलाइन जाहिरातींमध्ये भाजपचाच वाटा मोठा, २०१९च्या तुलनेत तिप्पट वाढ
Kumar Ketkar, Kumar Ketkar opinion,
भाजप २०० पेक्षा अधिक जागा जिंकणार नाही, माजी खासदार कुमार केतकर यांचे परखड मत
bank of Maharashtra loan disbursement increased by 16 percent
‘महाबँके’च्या कर्ज वितरणात १६ टक्क्यांची वाढ

अशी आहे राष्ट्रपती निवडीची प्रक्रिया

  • या निवडणुकीसाठी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य मतदान करतात.

 

  • यानुसार लोकसभेचे ५४३ सदस्य आणि राज्यसभेचे २३३ सदस्य असे एकूण ७७६ मतदार आहेत.

 

  • संसद मतदारक्षेत्रातून एका खासदाराचे मतदान मूल्य ७०८ इतके आहे.

 

  • हे मूल्य ३० विधानसभांच्या एकूण मतदान मूल्य भागिले संसद सदस्य संख्या या आधारावर निश्चित केले जाते. ३० विधानसभांचे ४१२० सदस्यांचे मूल्य हे ५,४९,४७४ इतके आहे.

 

  • एकूण मतमूल्य गुणिले लोकसभेचे सदस्य या गुणोत्तराने संसदेच्या एकूण मताचे मूल्य निश्चित केले जाते. म्हणजे ७०८ गुणिले ७७६= ५,४९,४०८ संसदेचे एकूण मतमूल्य

 

  • महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ सदस्याचे एकूण मतमूल्य हे ५०,४०० आहे.

 

  • १९७१ साली राज्याची असलेली लोकसंख्या भागिले सदस्य संख्या गुणिले १००० = मूल्य या गुणोत्तराच्या आधारे विधानसभा सदस्याचे मतमूल्य निश्चित केले जाते.

 

  • यानुसार महाराष्ट्राचे ५०४१२२३५ = १७५२८८ x १०००

 

  • १७५ गुणिले सदस्य संख्या २८८= ५०,४०० हे महाराष्ट्र मतमूल्य निश्चित केले जाते.

 

  • ३० विधानसभेतील एकूण मतमूल्य अधिक संसद सदस्य मतमूल्य मिळून एकूण मतदार मूल्य निश्चित केले जाते. ५४९४७४+५४९४०८=१०,९८,८८२