प्रशासनाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी मोदी शासनाने हाती घेतलेल्या विशेष मोहिमेत आता आणखी एक पाऊल पुढे टाकण्यात आले आह़े  शासकीय कार्यालयांतील कार्यसंस्कृती सुधारावी, यासाठी कॅबिनेट सचिवांनी आता आणखी एक मार्गदर्शक तत्त्व अधिकाऱ्यांना आचरण्यात आणायला सांगितले आह़े  कार्यालयांतील एकंदर वातावरणात सुधारणा करण्यात यावी़  तसेच विशेषत: जनतेशी थेट संबंध येणाऱ्या कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांनी कामाच्या वेळा काटेकोरपणे पाळाव्यात, असे बजावण्यात आले आह़े
कार्यस्थळाची नियमित स्वच्छता राखण्यात यावी आणि कार्यालयीन वातावरणात लक्षणीय सुधारणा घडवावी़  अधिकाऱ्यांनी या सुधारणांवर सातत्याने लक्ष ठेवाव़े,असेही मुख्य सचिवांनी सांगितले आह़े  कार्यालयात धूळ असू नय़े  जुने कागद, दर्शनी भागांत पडलेले जुने फर्निचर यांची वेळच्या वेळी वासलात लावण्यात यावी़  जिन्याचे कोपरे रंगलेले नसावेत, अशा सूचना केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने प्राप्तिकर विभागाला पाठविलेल्या नोटिशीत देण्यात आल्या आहेत़  हे आदेश कॅबिनेट सचिवांकडून आल्याचेही नमूद करण्यात आले आह़े