सीमेपलीकडून दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानविरोधात कारवाई करण्याचा भारताचा विचार असून, त्या देशाला वेगळे पाडण्याचे राजनतिक धोरण आखले आहे, असे अमेरिकी संरक्षण गुप्तचरांनी म्हटले आहे. दरम्यान, अफगाणिस्तानात कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना पाकिस्तानने आश्रय दिल्याचा आरोपही त्यांनी केला.

संरक्षण गुप्तचर संस्थेचे संचालक लेफ्टनंट जनरल व्हिन्सेंट स्टेवर्ट यांनी सांगितले, की भारताने पाकिस्तानला राजनतिक पातळीवर वेगळे पाडण्याचे ठरवले आहे. शिवाय सीमेपलीकडून दहशतवाद पसरवणाऱ्या पाकिस्तानविरोधात कारवाई करण्याचे ठरवले आहे. सिनेट आम्र्ड सíव्हसेस कमिटीला त्यांनी काँग्रेसमधील सुनावणीवेळी ही माहिती दिली. प्रत्यक्ष ताबारेषेवर भारताने पाकिस्तानी छावण्यांवर ९ मे रोजी हल्ले केल्याचे काल जाहीर करण्यात आल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले आहे. काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या विशेष दलांनी दोन भारतीय जवानांचा शिरच्छेद केल्यानंतर नऊ दिवसांनी भारताने पाकिस्तानी छावण्या उद्ध्वस्त केल्या.

स्टेवर्ट यांनी सांगितले, की भारत लष्कराचे आधुनिकीकरण करीत आहे व िहदी महासागरातील हितसंबंध जपण्याचेही भारताचे प्रयत्न आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतर भारत व पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय संबंध बिघडले आहेत. सप्टेंबरमध्ये काश्मीरमधील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर भारताने सीमेपलीकडे दहशतवाद्यांच्या छावण्यांवर हल्ले केले होते. पाकिस्तानने पश्चिम सीमेवरील दहशतवाद विरोधी मोहीम कमी करून देशभरात कारवाई सुरू केली आहे, त्यामुळे त्यांच्या देशातील दहशतवादी िहसाचार काही प्रमाणात कमी झाला आहे. पाकिस्तान विरोधी दहशतवादी गट अजून हल्ले करण्याच्या विचारात आहेत. पाकिस्तानचा अण्वस्त्र साठा वाढत असून, त्याचा अमेरिकेला धोका आहे. अण्वस्त्रांचे दहशतवाद्यांपासून रक्षण करण्यासाठी पाकिस्तान उपाययोजना करीत आहे, असे त्यांनी सांगितले.

[jwplayer 9xaU4cUi-1o30kmL6]