मॉलमधील पबमध्ये आलेल्या डच महिलेचा विनयभंग केल्यामुळे इंदौर पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली. या प्रकरणी संबंधित महिलेच्या मैत्रिणीने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यावर ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदौरमधील एका मॉलमध्ये असलेल्या पबमध्ये पीडित महिला आली होती. तेथून बाहेर पडल्यावर तिचा मोबाईल पबमध्येच विसरला असल्याचे तिच्या लक्षात आले. पुन्हा पबमध्ये मोबाईल आणण्यासाठी गेल्यावर आजूबाजूला कोणी नाही हे पाहून तेथील दोन तरूण कर्मचाऱ्यांनी तिचा विनयभंग केला. ही घटना डच महिलेने आपल्या मैत्रिणीला सांगितल्यावर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली.
संबंधित महिला एका लग्नासाठी इंदौरमध्ये आली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.