सीमेपलीकडून काश्मीरमध्ये दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नांत आहेत, मात्र सीमा सुरक्षा दल सावध असून दहशतवाद्यांना घुसखोरीची संधीच दिली जाणार नाही, असे सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक पी. एस. संधू यांनी सांगितले.
सीमेपलीकडून घुसखोरीचे सातत्याने प्रयत्न सुरू असून त्यामध्ये खंड पडण्याची शक्यता नाही, दहशतवादी संधीची प्रतीक्षा करीत आहेत, मात्र त्यांना यशस्वी होऊ न देणे हेच आमचे कर्तव्य आहे, असे संधू म्हणाले.सीमेपलीकडे दहशतवादी जमलेले आहेत आणि दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांच्या संख्येत घट झालेली नाही. या केंद्रांमधील दहशतवाद्यांच्या संख्येतही कपात झालेली नाही आणि ते घुसखोरीच्या तयारीतच आहेत, असेही महानिरीक्षक म्हणाले.