जपानी जहाजाने १९३० सालचे देयक न भरल्याचे कारण दाखवीत चीनने जपानचे एक जहाज जप्त केले आह़े  त्याचा मंगळवारी चीनने तीव्र निषेध केला आह़े  या प्रकरणामुळे चीन आणि जपानमधील जुने हाडवैर नव्याने उफाळून आले आह़े
शांघायमधील अधिकाऱ्यांनी शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, जपानी कंपनी मित्सुई ओएसकेच्या मालकीच्या एका जहाजाने मोठे देयक थकविल्यामुळे ते जप्त करण्यात आले आह़े  चीनच्या म्हणण्यानुसार, दुसऱ्या महायुद्धापूर्वी जपानने शेजारच्या चीनचा प्रांत काबीज केला होता़  त्या वेळची ही देयके आहेत़  
या जहाजाच्या प्रकरणाबरोबरच दोन्ही देशांमध्ये एका द्वीपसमूहाबाबतही वाद आहेत़  तसेच इतिहासाचे विविध पद्धतींनी  विवेचन करण्यावरूनही त्यांच्यात वाद आहेत़
अमेरिकेच्या प्रादेशिक सुरक्षा कराराच्या वहिवाटीचे लक्ष्य ठेवून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा बुधवारी टोकियोच्या दौऱ्यावर येणार आहेत़  त्यामुळे चीनकडून जाणीवपूर्वक ही कुरापत काढण्यात आल्याचे मत जपानी माध्यमांकडून मांडण्यात आले आह़े
आम्ही चीनच्या कारवाईचा आमच्या राजनैतिक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून निषेध केला आह़े  तसेच या प्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्याची मागणीही आम्ही केली आहे, असे जपानचे मुख्य कॅबिनेट सचिव योशिहिदे सुगा यांनी सांगितल़े