हॉलिवूड अभिनेत्री मर्लिन मन्रो लॉसएंजल्स येथे ज्या घरात निवर्तली त्या घराची विक्री ६९ लाख अमेरिकी डॉलर्सला करण्यात येणार आहे. मर्लिन मन्रो हिने १९६२ मध्ये तिचा तिसरा पती आर्थर मिलर याच्याशी घटस्फोट झाल्यानंतर तिने कॅलिफोíनयात ब्रेन्टवूड येथे घर विकत घेतले होते, पण त्यानंतर काही महिन्यांतच ती मरण पावली आहे. वयाच्या ३६ व्या वर्षी अमली पदार्थ जास्त सेवन केल्याने तिचा मृत्यू झाला होता. मर्लिन मन्रोने या घराबाबत असे म्हटले होते, की माझे मित्र जर काही अडचणीत असतील तर येथे येऊन राहू शकतात व ते येथे राहू इच्छित असतील नसतील मला माहीत नाही, पण त्यांची परिस्थिती सुरळीत होईपर्यंत ते येथे राहू शकतील.

los-angeles-home

या घराला चार बेडरूम्स असून चार बाथरूम्स आहेत. स्थावर मालमत्ता एजंट लिसा ऑप्टिकन यांनी सांगितले, की हे घर अनेकदा विकले गेले आहे, पण अजून त्याचे सौंदर्य मर्लिन राहात होती तेव्हापासून तसेच आहे. यापूर्वीच्या मालकांनी त्यात काही बदल केले, पण एकूण वास्तू तशीच आहे. मर्लिनला त्या वास्तूचे सौंदर्य जसे भावले तसेच ते कायम आहे. प्रवेशद्वार, परसदार व सगळे जसेच्या तसे आहे. तेथे बाग व स्वीमिंग पूलही आहे. मर्लिनला मोठय़ा बंगल्यापेक्षा खऱ्या अर्थाने घर म्हणता येईल अशी वास्तू हवी होती. या घराचा आकार २६२४ चौरस फूट असून स्वीिमग पूल व सायट्रस ग्रोव्ह ही त्याची वैशिष्टय़े आहेत.