गोव्यातील बीचवर बिकनींवर बंदी घालावी असे वक्तव्य करणारे गोव्याचे परिवहनमंत्री सुदिन ढवळीकर यांचे भाऊ आणि गोव्याचे सहकारमंत्री दीपक ढवळीकर यांनी नरेंद्र मोदी हे देशाला हिंदू राष्ट्र म्हणून विकसित करतील, असे वक्तव्य केले आहे.
लोकसभेत मिळविलेल्या यशाबाबत मोदींचे अभिनंदन करणारा ठराव विधानसभेत मांडण्यात आला होता. त्या वेळी चर्चेदरम्यान ढवळीकर यांनी हे वक्तव्य केले.
मोदींच्या नेतृत्वात भारत हिंदू राष्ट्र  म्हणून विकसित होत असून, त्या दृष्टीने पंतप्रधान काम करतील असे वाटते, असे ढवळीकर म्हणाले. ते भाजपचा  मित्रपक्ष असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे आहेत.