काही राजकीय नेत्यांच्या अज्ञानाला परिसीमा नसते. मध्य प्रदेशच्या मंत्री कुसुम मेहदळे यांनी शांततेचे नोबेल मिळाले म्हणून त्यांचे सहकारी मंत्री कैलाश विजयवर्गीय यांचे अभिनंदन केले आहे. प्रत्यक्षात मध्य प्रदेशचे कैलाश सत्यार्थी यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
आपण दोनदा मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांच्या सरकारमध्ये होतो. नंतर उमा भारती मंत्रिमंडळात होतो पण सत्यार्थी यांना कधी भेटण्याची संधी मिळाली नाही, अशी तक्रार मेहेंदळे यांनी केली.
मेहदळे यांच्याकडे सध्या पशुसंवर्धन, सार्वजनिक आरोग्य, अभियांत्रिकी, फलोद्यान, अन्न प्रक्रिया, कुटीर व ग्रामीण उद्योग व विधिमंडळ कामकाज ही खाती आहेत. त्यांनी व इतर आमदारांनी अलीकडेच नोबेल विजेते म्हणून कैलाश विजयवर्गीय यांचे अभिनंदन केल्याबाबत विचारले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.
१० डिसेंबरला सत्यार्थी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला त्यावेळी मध्य प्रदेशच्या सत्यार्थी यांचे सर्वानीच कौतुक केले. मात्र राज्यातील मंत्र्यांनाच त्यांची माहिती नसावी याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.