नागालँडमध्ये रविवारी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर केलेल्या हल्ल्यामध्ये आसाम रायफल्सचे आठ जवान शहीद झाले, तर सहा जण जखमी झाले आहेत.
दहशतवाद्यांनी गस्तिवर असलेल्या जवानांना सापळा लावून स्फोट घडवून आणला. नागालँडच्या मोन जिल्ह्यातील चांगलांग सू भागामध्ये दुपारी २.३० वाजता हा स्फोट घडवण्यात आल्याचे सरकारी सुत्रांनी सांगितले. आसाम रायफल्सचे १८ जवान सीमेवर गस्त घालत असताना हा हल्ला झाला. जवानांनी केलेल्या प्रत्युत्तरात एक दहशतवादी ठार झाला आहे.