पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून पाच दिवसांच्या जापान दौऱ्यावर आहेत. भारत-जपान यांच्यातले लष्करी आणि व्यापारी संबंध आणखी दृढ करण्यासाठी या दौऱ्यात विशेष करार होणार आहेत.
सर्वात पहिले पंतप्रधान जापानची अध्यात्मिक नगरी म्हणून ओळखली जाणा-या क्योटो शहरात जाणार आहेत. येथे त्यांचे स्वागत जापानचे पंतप्रधान शिंजो अबे खुद हे करतील. मोदींच्या या दौ-यामुळे दोन देशांमध्ये नवीन इतिहास लिहिला  जाईल अशी आशा आहे. पाच दिवसांच्या या दौऱ्यात मोदी संरक्षण, नागरी अणू उर्जा, पायाभूत सुविधा क्षेत्रात अत्यंत महत्वाचे करार होणार आहे. मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असतांनाही जापानच्या दौऱ्यावर गेले होते.