येथील नर्सरी शाळेत शिकणाऱ्या साडेतीन वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शाळेच्या कार्यालयीन सहाय्यकास पोलिसांनी शनिवारी अटक केली.
२२ ऑक्टोबर रोजी ऑर्चिड्स इंटरनॅशनल स्कूल या शाळेत ही घटना घडली होती. याप्रकरणी शाळेचा कर्मचारी गुंडाप्पा (४२) याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. संबंधित मुलीचा जबाब आणि मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
या घटनेनंतर बंगळुरू शहरात संतापाची एकच लाट उसळली होती. मात्र, पोलिसांनी तातडीने कारवाई केली.  मुलीची एकूण मानसिक अवस्था बघता, तपासकाम कठीण होते. परंतु मुलीने योग्य माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.