इराणवर आणखी निर्बंध टाकण्याचा विचार जर के ला जात असेल तर आपण काँग्रेसने आणलेल्या अशा कुठल्याही विधेयकावर नकाराधिकार वापरू, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी दिला आहे. इराणवर आणखी र्निबध लादल्यास त्या देशाबरोबर चालू असलेल्या आण्विक वाटाघाटी फिसकटतील असे त्यांनी म्हटले आहे.
ओबामा यांनी अमेरिकी काँग्रेस सदस्यांना सांगितले की, इराणबरोबर वाटाघाटी सुरू असताना त्या देशावर आणखी र्निबध लादू नका अन्यथा जेव्हा ते विधेयक आपल्याकडे येईल तेव्हा त्यावर आपण नकाराधिकार वापरू. राजनैतिक मार्गाने इराणशी वाटाघाटी यशस्वी होण्याची शक्यता ५०-५० टक्के आहे. इराण राजवटीला नेहमी पश्चिमेविषयी संशय वाटत आला आहे. पूर्वी इराणने गुप्तपणे हा अणुकार्यक्रम राबवला होता. अनेक विषयांवर इराणशी आमचे मतभेद आहेत.
ओबामा म्हणाले की, अंतरिम वाटाघाटीत निदान इराण चर्चेस तरी तयार झाला आहे  त्यांना आणखी र्निबध नको आहेत असाच त्याचा अर्थ आहे. हे तांत्रिकृष्टय़ा र्निबध नाहीत केवळ अतिरिक्त र्निबध लादणारे कायदे आहेत पण इराण त्याचा वेगळा अर्थ लावेल व इतरही देश तसेच करतील ही भीती आहे. त्यामुळे तसे केले तर इराणशी संपूर्ण वाटाघाटी फिसकटतील व तसे झाले तर इराणवर काहीही धरबंध राहणार नाही. इराण वाटाघाटीच्या पातळीवर असताना आपण असे करणे चुकीचे आहे. त्यांनी हेवी वॉटर अणुभट्टी तयार केली होती ती लष्करी मार्गाने नष्ट करणे अवघड आहे. भूमिगत अणुव्यवस्था आहेत त्याकडेही पोहोचणे आपल्याला अवघड आहे त्यामुळे वाटाघाटी हाच योग्य मार्ग आहे असे ते म्हणाले.