दहशतवाद हा भारतासाठीच नव्हे, तर जगभरातील अनेक देशांसाठी चिंतेचा विषय असून एकच देश सर्व ठिकाणी दहशतवादाची निर्यात करत असल्याचे भाष्य करीत मोदींनी पाकिस्तानला फटकारले. उरी हल्ल्यातील शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असे सांगत मोदींनी पाकिस्तानवर शाब्दिक हल्ला केला.  भारत दहशतवादासमोर कधीही झुकलेला नाही आणि झुकणारही नाही, अशा भाषेत मोदींनी शनिवारी पाकिस्तानला सुनावले. उरीमधील दहशतवादी केरळमध्ये राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मोदींनी कोझीकोडच्या खुल्या व्यासपीठावरुन केरळमधील जनतेशी संवाद साधला.

पाकिस्तानमुळेच आशियायाई देशामध्ये अशांती माजली असल्याचे सांगत मोदींनी  पाकिस्तान पोसत असलेल्या दहशतवादावर बोट ठेवले. दहशतवादाची ही समस्या फक्त भारतामध्येच नाही तर  जगभरातील इतर देशातही पाकिस्तान हा एकमेव देश दहशतवाद्यांची  निर्यात करीत असल्याचे मोदींनी यावेळी म्हटले.  दहशतवादी कृत्यातून पाकिस्तान आपल्या शेजारील बांगलादेश आणि अफगाणिस्तानसाठी देखील दुखणे बनला असल्याचे मोदी म्हणाले.