दिल्ली विद्यापीठ, अलिगड मुस्लीम विद्यापीठ, आयआयटी दिल्ली आणि आयआयटी बीएचयू या प्रमुख शैक्षणिक संस्थांसह किमान १० संस्थांच्या अधिकृत संकेतस्थळांवर पाकिस्तान झिंदाबाद’ अशी घोषणा टाकून ही संकेतस्थळे हॅक करण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी घडला.

हॅक करणारा गट ‘पाकिस्तान हॅकर्स’ या नावाने समोर आला असून त्यांनी, आपण कोणताही फेरफार अथवा चोरी केलेली नसून केवळ भारतीयांना समज दिली असल्याचे संदेशात म्हटले आहे. भारत सरकार आणि भारतातील जनता यांना या हॅकर्सनी शुभेच्छा दिल्या आहेत, आपले जवान काश्मीरमध्ये काय करीत आहेत त्याची कल्पना आहे का, काश्मीरमध्ये त्यांनी अनेक निष्पापांची हत्या केली आहे, असा संदेश या सर्व संकेतस्थळांवर टाकण्यात आला आहे. अनेक मुलींवर तुमच्या जवानांनी बलात्कार केला असून अद्यापही करीत आहेत, असेही या हॅकर्सनी म्हटले आहे.

या संस्थांना त्रास

कोटा विद्यापीठ, लष्कर व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान संस्था, ग्रेटर नोइडा, डिफेन्स इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी, लष्कर व्यवस्थापन संस्था, कोलकाता, नॅसनल एअरोस्पेस लॅबोरेटरीज अ‍ॅण्ड बोर्ड ऑफ रीसर्च इन न्यूक्लिअर सायन्स या संस्थांच्या वेबसाइट हॅक करण्यात आल्या आहेत.