‘जागे व्हा, जगातील सर्वात महत्त्वाचे पंतप्रधान येत आहे’, हा मथळा आहे इस्त्रायलमधील एका वृत्तपत्राचा. या वृत्तपत्राने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या Narendra Modi आगामी इस्त्रायल दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा लेख छापला होता. तर ट्रम्प यांच्या इस्त्रायल दौऱ्यातून खूप अपेक्षा होत्या. पण त्या दौऱ्याने निराशा केली असा आरोप इस्त्रायलच्या वृत्तपत्रांमधून करण्यात आला. त्यामुळे इस्त्रायलमध्येही Israel सध्या मोदीलाट असल्याचे दिसून येते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ४ जुलैपासून तीन दिवसांसाठी इस्त्रायलच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर इस्त्रायलमधील वृत्तपत्रांमध्ये मोदींचे कौतुक सुरु आहे. ‘द मार्कर’ या वृत्तपत्राने मोदींच्या दौऱ्यासाठी एक लेख छापला आहे. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करण्यात आले आहे. ट्रम्प यांच्या इस्त्रायल दौऱ्यातून आशा होती. पण पदरात काहीच पडले नाही. तर दुसरीकडे मोदी हे १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशाचे नेते असून त्यांची लोकप्रियता सर्वाधिक आहे. जगात सर्वात झपाट्याने विकास करणाऱ्या अर्थव्यवस्थेचे ते प्रतिनिधीत्व करतात आणि यामुळेच ते दखलपात्र ठरतात असे वृत्तपत्रात म्हटले आहे.

chhota rajan still alive
दाऊद इब्राहिमचा सर्वात मोठा शत्रू अद्याप जिवंत, ९ वर्षांनी छोटा राजनचा फोटो आला समोर
us citizenship news
अमेरिकेचं कायमस्वरुपी नागरिकत्व स्वीकारणाऱ्यांमध्ये भारतीय दुसऱ्या क्रमांकावर; २०२२ चा आकडा थेट ६६ हजारांच्या घरात!
World's youngest billionaire List By Forbes
१९ वर्षीय तरुणी ठरली जगातील सर्वात तरुण अब्जाधीश, किती आहे संपत्ती? भारतात हा मान कुणाला मिळाला, हे ही पाहा
ring of fire
विश्लेषण : भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे ‘रिंग ऑफ फायर’ नेमके कुठे आहे? या भागात सर्वाधिक भूकंप का होतात?

अन्य स्थानिक वृत्तपत्रांनीही मोदींच्या यात्रेकडे लक्ष दिले आदे. ‘द जेरुसलेम पोस्ट’ या न्यूजवेबसाईटने तर मोदींच्या दौऱ्यासाठी ‘मोदी व्हिझिट’ ही वेगळी लिंकच तयार केली आहे. यात मोदी आणि भारताविषयीच्या बातम्या दिसतात. मोदी यांनी पॅलेस्टाईनला जाणे टाळले असून पॅलेस्टाईनमधील नेते मेहमूद अब्बास यांच्याशी ते चर्चा करणार नाहीत असा याकडेही अनेक वृत्तपत्रांनी लक्ष वेधले आहे. इस्त्रायल दौरा करणारे मोदी भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. इस्त्रायलच्या ७० वर्षांच्या इतिहासात भारताच्या पंतप्रधानाने आमच्या देशाचा दौरा केला नव्हता. मी त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहे असे इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी म्हटले आहे.