अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा व्हाईट हाऊसमधून बाहेर पडून डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसचे रहिवासी होणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प व्हाईट अमेरिकेचे ४५ वे अध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. बराक ओबामांचा कार्यकाळ संपल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेणार आहेत. मात्र ओबामा पायउतार होत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर नंबर वन होणार आहेत.

२००९ साली म्हणजेच गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी सोशल मीडियावर सक्रीय धाले. सध्या पंतप्रधान मोदी ट्विटर, फेसबुक, युट्यूब आणि गुगल प्लसवर सक्रीय आहेत. २००९ साली ट्विटरवर आलेल्या पंतप्रधान मोदींचे २ कोटी ६० लाखांहून फॉलोअर्स आहेत. तर फेसबुकवर पंतप्रधान मोदींना फॉलो करणाऱ्यांची संख्या ३ कोटी ९० लाखांपेक्षा अधिक आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होणाऱ्या ओबामांचे ८ कोटीहून अधिक फॉलोअर्स आहेत. पंतप्रधान मोदींपेक्षा अधिक फॉलोअर्स असलेले बराक ओबामा हे सध्याच्या घडीला एकमेव जागतिक नेते आहेत.

Lok Sabha elections between Narendra Modi and Rahul Gandhi and Modi will become PM for third time says Devendra Fadnavis
गरिबांच्या आशीर्वादामुळे मोदींचा साधा केसही वाकडा होणे नाही – देवेंद्र फडणवीस
Sharad Pawar On PM Narendra Modi
“पेट्रोलचे दर ५० दिवसात कमी करणार असं मोदी म्हणाले होते, आता तीन हजार दिवस..”, शरद पवारांचा सवाल
PM Modi Ramtek Sabha
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले, “इंडिया आघाडीला त्यांच्या पापाची शिक्षा…”
Narendra Modi sanjay raut
“इस्रायली जनतेच्या उद्रेकाचे ‘आफ्टर शॉक्स’ भारतातही बसणार”, ठाकरे गटाचा पंतप्रधान मोदींना सूचक इशारा

बराक ओबामा अमेरिकेच्या अध्यक्षपदावरुन पायउतार झाल्यावर पंतप्रधान मोदी सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असलेले देशप्रमुख होणार आहेत. अमेरिकेन अध्यक्ष पदाची शपथ घेणारे डोनाल्ड ट्रम्प अनेकदा त्यांच्या ट्विटमुळे चर्चेत असतात. मात्र त्यांच्या फॉलोअर्सची संख्या (२ कोटी) पंतप्रधान मोदींच्या फॉलोअर्सपेक्षा कमी आहे.

सध्या पंतप्रधान मोदींचे ट्विटरवर २ कोटी ६० लाख, फेसबुकवर ३ कोटी ९० लाख, गुगल प्लसवर ३२ लाख, लिक्डइनवर २ लाख, इन्स्टाग्रामवर ५८ लाख आणि युट्यूबवर ५ कोटी ९१ हजार फॉलोअर्स आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि भाजपने सोशल मीडियाचा खुबीने वापर केला होता. विशेषत: ट्विटर आणि फेसबुकचा वापर करत नरेंद्र मोदी आणि भाजपने मतदारांशी संवाद साधला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील राजनाथ सिंह, सुषमा स्वराज आणि सुरेश प्रभू हे मंत्री सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर करतात. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आतापर्यंत अनेकांच्या समस्या ट्विटरच्या माध्यमातून सोडवल्या आहेत. तर सुरेश प्रभू यांच्या रेल्वे मंत्रालयाकडूनही प्रवाशांच्या समस्या ट्विटरच्या माध्यमातून सोडवल्या जातात.

संगणकीकरणाला चालन देणारा ‘डिजिटल इंडिया’ हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. यासाठी मोदी सरकारकडून देशातील मुलभूत सुविधा आणि इंटरनेटचे जाळे विस्तारण्यावर भर दिला जातो आहे. पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या शेवटच्या अमेरिका दौऱ्यात गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई आणि फेसबुकचे संस्थापक मार्क झकरबर्ग यांची भेट घेतली होती.