ख्रिश्चन धर्मातील सर्वोच्च धर्मगुरू पोप बेनेडिक्ट १६ येत्या २८ फेब्रुवारीला पायउतार होणार आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा देत असल्याचे पोप बेनेडिक्ट १६ यांनी सांगितले. राजीनामा देऊन या सर्वोच्च पदावरून पायउतार होणारे गेल्या ६०० वर्षातील ते पहिले पोप आहेत. 
व्हॅटिकनमधील कार्डिनलची बैठक पोप यांनी बोलावली होती. त्यामध्ये त्यांनी आपल्या राजीनाम्याविषयी माहिती दिली. सर्वोच्च पदावरील जबाबदारी सांभाळणे वाढते वयोमान आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे अवघड होऊ लागल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. येत्या ३१ मार्चपूर्वी नव्या पोपची निवड करण्यात येईल.