भाजप खासदार उदित राज यांनी उसेन बोल्ट बीफ खातो म्हणून जगातील सर्वात वेगवान धावपटू असल्याचे वक्तव्य करून नवा वाद निर्माण केला होता. परंतु केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उदित राज यांच्या वक्तव्याची त्यांच्या खास शैलीत खिल्ली उडवली आहे. खाण्यापिण्याच्या सवयीवरून कोणाचे श्रेष्ठत्व ठरत नाही, असे म्हणत त्यांनी मी बीफ खात नाही तरीही मंत्री बनलो, असे मजेशीर वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांनीही दाद दिली.
एक पत्रकार परिषदे दरम्यान त्यांना उदित राज यांच्या बीफ बद्दलच्या वक्तव्याबाबत विचारण्यात आल्यानंतर ते म्हणाले, उदित हे माझे चांगले मित्र आहेत. मध्येच ते थांबले व आपल्या सहकाऱ्याला मराठीमधून त्या खेळाडूचे नाव विचारले. मग ते म्हणाले, उसेन बोल्ट हा महान खेळाडू असून त्याने अनेक पदके पटकावली आहेत. पण आपल्या आहाराच्या पद्धतीवरून तुम्ही महान बनत नाही. मग त्यांनी हसत म्हटलं, केवळ बीफ खाण्यानेच सन्मान मिळत नाही. मी बीफ खात नाही, तरी मी मंत्री बनलोय.
उदित राज आणि रामदास आठवले हे दोघेही दलित खासदार असून आठवले हे भाजपचा सहयोगी पक्ष रिपाइंचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. तर उदित राज हे उत्तर- पूर्व दिल्लीतून लोकसभेवर निवडून आले आहेत. बोल्ट बीफ खात असल्यामुळेच ऑलिम्पिकमध्ये नऊ सुवर्ण पदक पटकावू शकला असे ट्विट उदित राज यांनी सोमवारी केले होते. त्यांच्या या ट्विटमुळे मोठा वाद झाला होता. नंतर त्यांनी आपण बीफ खाण्याचे समर्थन करत नसल्याचे म्हटले होते.

Sanjay Patil vs laxmi hebbalkar
“त्यांना एक पेग…”, भाजपाचे माजी आमदार संजय पाटील यांची महिला मंत्र्याबद्दल वादग्रस्त टिप्पणी
cm eknath shinde lok sabha marathi news, thane lok sabha marathi news
विश्लेषण: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजप नेते हक्क का सांगतात? भाजपच्या रेट्यासमोर शिंदेसेनेची कोंडी?
Political Speculation Swirls as Former Minister Ambrishrao Atram Remains Absent from Campaigning in Gadchiroli Chimur
भाजपच्या प्रचारात अम्ब्रीशराव आत्राम यांच्या अनुपस्थितीची चर्चा; मन वळविण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची मध्यस्थी
uddhav thackeray eknath shinde (2)
ठाकरे गटाचा कल्याण लोकसभेचा उमेदवार ठरला? अयोध्या पौळ माहिती देत म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांच्या खासदार मुलाच्या…”