गुजरातमधील जामनगरच्या भाजप खासदार पुनमबेन यांनी भागवत कथा कार्यक्रमात गरबा नृत्य करताना अवघ्या ३० सेकंदात तब्बल ३ कोटी रुपयांची उधळण केल्याचे समोर आले आहे.
या कार्यक्रमादरम्यान खासदार पूनमबेन यांनी इतरांसमवेत काही काळ नृत्य केले. यावेळी चक्क तीस सेकंदात तीन कोटी रुपयांच्या नोटांची उधळण करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुनमबेन यांच्याकडून पैशाची उधळण होत असल्याचे व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रसिद्ध झाल्यानंतर, पुनमबेन यांनी हे पैसे सामाजिक कार्यासाठी वापरण्यात येणार असल्याचे सांगितले. या घटनेप्रकरणी गुजरात येथील काँग्रेसने भाजपवर जोरदार टीका केली आहे.
२०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत पूनमबेन जामनगरमधून निवडून आल्या.