दादरी प्रकरणानंतर कुत्र्याला दगड मारण्याबाबतचे विधान करणारे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या फौजदारी स्वरूपाच्या तक्रारीवर कोणती कारवाई करण्यात आली त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्ली न्यायालयाने गुरूवारी पोलिसांना दिले.

महानगर दंडाधिकारी मुनीश गर्ग यांनी पोलिसांना १६ नोव्हेंबपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. सिंग यांच्यावर समन्स बजावून त्यांच्याविरुद्ध खटला चालवावा आणि दंड ठोठावून त्यांची संपूर्ण मालमत्ता जप्त करावी असे तक्रारदार सत्यप्रकाश गौतम यांनी म्हटले आहे.