शिवजयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्याला आणि शौर्याला वंदन केले आहे. शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचा अभिमान असल्याचेही त्यांनी ट्विटरवर ट्विट केले आहे.
शासन निर्णयानुसार राज्यात आज शिवजयंती साजरी केली जात आहे. शिवजयंतीचा मुख्य कार्यक्रम शिवनेरीवर होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर मोदी यांनी सकाळी त्यांच्या ट्विटर हॅंडलवर विविध ट्विट करून शिवाजी महाराजांबद्दल कृतज्ञतापूर्वक आदरभाव व्यक्त केला. शिवाजी महाराजांनी उत्तम प्रशासनाचा आदर्श घालून दिल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.