अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील प्रवेशाच्या धोरणांमध्ये बदल केल्याने, आखातामधील सात देशांच्या नागरिकांना प्रवेश बंदी लागू केल्याने अमेरिकेत जाणाऱ्या अनेकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो आहे. रविवारी नायजेरियाहून अमेरिकेला जाणाऱ्या एका अभियंत्याला या सगळ्यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. नायेजरियातील लागोसमधून जॉन एफ. केनेडी विमानतळावर उतरलेल्या २८ वर्षीय सेलेस्टिन ओमिन फटका बसला.

अंडेला या स्टार्ट अप कंपनीत अभियंता असलेला सेलेस्टिन ओमिन रविवारी जॉन एफ. केनेडी विमानतळावर उतरला होता. सेलेस्टिन ओमिनची कंपनी आफ्रिकेतील डेव्हलपर्सना अमेरिकेतील रोजगार पुरवठादारांना जोडण्याचे काम करते. केनेडी विमानतळावर सेलेस्टिन ओमिनला तपासणीदरम्यान तो अभियंता असल्याचे सिद्ध करण्यास सांगण्यात आले. कतार एअरवेजमधून तब्बल २४ तासांचा प्रवास करुन न्यूयॉर्कमध्ये दाखल झालेल्या ओमिनला तो अभियंता आहे, हे सिद्ध करण्याचे आव्हान विमानतळावरील सुरक्षा अधिकारी आणि प्रशासनाने दिले. सेलेस्टिन ओमिनला अमेरिकेच्या दौऱ्यासाठी अत्यंत कमी मुदतीचा विसा देण्यात आला.

The debut of Bharti Hexacom itself gave investors a return of 43 percent
‘भारती हेक्साकॉम’चा पदार्पणालाच गुंतवणूकदारांना ४३ टक्क्यांचा परतावा
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात
serious allegations against boeing
अन्वयार्थ : बडयांवर बडग्याची बाजारकेंद्री ‘संस्कृती’
Force Motors out of tractor business news
फोर्स मोटर्स ट्रॅक्टर व्यवसायातून बाहेर

न्यूयॉर्कला उतरताच विमानतळावर नेमेके काय घडणार आहे, याची कोणतीही कल्पना नसलेला ओमिन कस्टम्स आणि सीमा सुरक्षा अधिकाऱ्यांची वाट पाहत २० मिनिटे थांबला होता. विविध प्रकारचे प्रश्न विचारण्यात आल्यानंतर सेलेस्टिन ओमिनला एका लहान खोलीत नेण्यात आले. याठिकाणी त्याला त्याच्या पेशाविषयी काही प्रश्न विचारण्यात आले. याठिकाणी काही काळ चौकशी करण्यात आल्यानंतर सेलेस्टिन ओमिनला एक तास बसवून ठेवण्यात आले. यानंतर पुन्हा तासभरानंतर कस्टम्सच्या नव्या अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी करण्यास सुरुवात केली.

‘तुम्ही सॉफ्टवेअर अभियंते असल्याचे तुमचा विसा सांगतो. हे खरे आहे का?’ या प्रश्नापासून सेलेस्टिन ओमिनच्या चौकशीला सुरुवात झाली. या प्रश्नाला सेलेस्टिन ओमिनने होकारार्थी उत्तर दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याला पेन आणि कागद देत त्याची परीक्षा घेण्यास सुरुवात केली. ‘बायनरी सर्च ट्रि संतुलित आहे, हे कसे ओळखाल? त्यासाठीची क्रिया लिहा. अॅबस्ट्रॅक्ट क्लास म्हणजे नेमके काय? तुम्हाला त्याची आवश्यकता का भासते?,’ अशा प्रश्नांची सरबत्ती सेलेस्टिन ओमिनवर करण्यात आली.

सेलेस्टिन ओमिनला अभियांत्रिकी क्षेत्रात सात वर्षांचा अनुभव आहे. मात्र अमेरिकेच्या विमानतळावर अशाप्रकारे चौकशी होण्याचा प्रसंग पहिल्यांदाच उद्भवल्याने सेलेस्टिन ओमिन यांचा प्रचंड गोंधळ उडाला. ओमिनला विचारण्यात आलेले बरेचसे प्रश्न हे अनेक उत्तरे असणारे होते. मात्र समोरचे अधिकारी ‘सॉफ्टवेअर अभियंत्याला विचारायचे प्रश्न’ यावर गुगलकडून मिळणाऱ्या माहितीवर प्रश्न विचारत होते. ओमिनच्या प्रत्येक प्रश्नानंतर अधिकाऱ्यांकडून त्याच्याकडे संशयाने पाहिले जात होते.