पाकिस्तानने बळकावलेला काश्मीरचा भूभाग परत मिळविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहीम हाती घ्यावी, असे आवाहन योगगुरू रामदेव बाबा यांनी केले आहे. काश्मीरचा बळकावलेला आणि वादग्रस्त प्रदेश मिळविण्यासाठी भारताने ठोस पावले उचलली पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यासाठी मोहीमच हाती घेतली पाहिजे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ काश्मीर कोणत्याही परिस्थितीत मिळविण्याच्या वल्गना करतात. हा भाग पाकिस्तानच्या ताब्यात असल्यामुळे आपल्या देशातील लहान मुलांना फक्त नकाशावरच काश्मीर पाहायला मिळतो. जेव्हा एखादा भ्याड देश सामर्थ्यशाली देशाचा भूभाग बळकावतो, तेव्हा शांत बसून चालत नाही, असे रामदेव बाबांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला लक्ष्य करणाऱ्या पाकिस्तानी भूमीतील दहशतवादी संघटनांचा बीमोड करण्यासाठी ठोस पावले उचलली पाहिजेत, असेही रामदेव बाबा यांनी सांगितले.
काश्मीर कधीच पाकिस्तानचे होऊ शकत नाही: सुषमा स्वराज
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे नवाज शरीफ यांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये निवडून आलेल्या सदस्यांसमोर भाषण करताना काश्मीर हा संयुक्त राष्ट्रांच्या पटलावरील मार्गी न लागलेला मुद्दा (unfinished agenda ) असल्याचे म्हटले होते. याशिवाय, जम्मू काश्मीरमधील सद्यस्थितीच्या पार्श्वभूमीवर नवाज शरीफ यांनी काही दिवसांपूर्वी काश्मीरी जनतेचा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडणार असल्याचे सांगितले होते. भारताकडून त्याला संयुक्त राष्ट्रांसह विविध व्यासपीठांवरून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले होते. पाकिस्तानने काश्मीरला दहशतवादाशिवाय काहीच दिलेले नाही. भारताचे नंदनवन असणाऱ्या काश्मीरवर पाकिस्तानचे दहशतवादी कधीच विजयी मिळवू शकणार नसल्याचे सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला सुनावले होते.
पाकिस्तानात शिक्षण नकोच!