भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामींनी महात्मा गांधींच्या हत्येविषयी राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला. ‘महात्मा गांधीची जेव्हा हत्या झाली तेव्हा त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले नव्हते. संसदेत यावर चर्चा करण्याची गरज आहे,’ असे स्वामी यावेळी म्हणाले. यामुळे स्वामी आणि काँग्रेसचे सभासद यांच्यामध्ये खडाजंगी झाली. स्वामी म्हणाले की, ‘मोदी सरकारने महात्मा गांधी हत्ये संदर्भातली अधिकतर कागदपत्र राष्ट्रीय संग्रहालयात ठेवली आहेत. मी ती वाचली त्यात अनेक खासदारांनी अपमानात्मक टिपण्णी केली आहे. ज्याला सर्वोच्च न्यायालयानेही याबाबद चेतावणी दिली आहे.’
काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी यावेळी विरोध दर्शवला पण उपाध्यक्ष पी. जे कुरियन यांनी स्वामींना बोलण्याची परवानगी दिली. फक्त कोणाच्याही नावाचा उल्लेख बोलण्यात नसावा असे त्यांनी नमुद केले. त्याला उत्तर म्हणून स्वामींनी, ‘फक्त महात्मा गांधींचेच नाव मी घेईन, बाकी कोणत्याही गांधींबद्दल मी बोलणार नाही,’ असे सांगितले.
महात्मा गांधींचे शवविच्छेदन करण्यात आले नव्हते. यामुळे महात्मा गांधींवर नेमकी किती गोळ्या झाडल्या गेल्या याबाबद आजही संभ्रम आहे. वृत्तपत्रांच्या माहितीनुसार त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या गेल्या. तर, फिर्यादी पक्षाने ३ गोळ्या झाडल्याचे सांगितले होते. शुन्यकाळात त्यांना दिलेला प्रश्नोत्तराचा वेळ संपल्यामुळे सुब्रमण्यम स्वामींना त्यांचे भाषण पूर्ण करता आले नाही.