मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावल्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका करताना पदाचा राजीनामा देणाऱ्या अनुप सुरेंद्रनाथ या सर्वोच्च न्यायालयाच्या तत्कालीन रजिस्ट्रारवर कारवाई करण्याबाबत सर्वोच्च न्यायालय विचार करत आहे.
मध्यरात्रीनंतरही याकूबच्या याचिकेवर सुनावणी घेण्यात आल्यावर याप्रकरणी न्यायालाने याकूबची फाशी कायम ठेवण्याचा निर्णय जाहीर केला होता. न्यायालयाच्या निर्णयावर सुरेंद्रनाथ यांनी निराशा व्यक्त केली होती. त्यामुळे न्यायायाच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान केला. गतवर्षी सुरेंद्रनाथ यांनी रजिस्ट्रार म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. सुरेंद्रनाथ दिल्लीतील राष्ट्रिय विधी महाविद्यालयात प्राध्यापक आणि मृत्यूदंड संशोधन प्रकल्पाचे संचालक आहेत. पदावरून मुक्त होताच सुरेंद्रनाथ यांनी याकूबला फाशी देण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. सुरेंद्रनाथच्या प्रतिक्रियेची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. हा आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यामुळे त्याच्यावर काय कारवाई करायची याचा लवकरच निर्णय घेतला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाचे महासचिव व्ही. एस. आर. अवधानी यांनी सुरेंद्रनाथचा बचाव करताना त्यांनी याकूबच्य निर्णयाविरूद्ध प्रतिक्रिया दिली नाही असे म्हटले आहे.