मँचेस्टर अरेनामधील आत्मघातकी हल्ल्याचा बदला म्हणून ब्रिटिश सरकारने आयसिसच्या तळांवर बॉम्बफेक सुरु केली आहे. ब्रिटिश हवाई दलाच्या विमानांनी आयसिसच्या तळांवर हल्ला चढवला आहे. ‘लव फ्रॉम मँचेस्टर’ असा संदेश लिहिलेले बॉम्ब ब्रिटिश सरकारच्या रॉयल एअर फोर्सकडून टाकण्यात आयसिसवर टाकण्यात आले आहेत.

ब्रिटिश हवाई दलाकडून आयसिसच्या तळांवर टाकण्यात येणाऱ्या बॉम्बचे फोटो जगभरातील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये ब्रिटिश जेट पेववे बॉम्ब घेऊन जाताना दिसत आहेत. या बॉम्बवर ‘लव फ्रॉम मँचेस्टर’ असा संदेश दिसतो आहे. द टेलिग्राफ या वृत्तपत्राने हे वृत्त दिले आहे. ब्रिटिश हवाई दलाच्या प्रवक्त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेले छायाचित्र खरे असल्याचे म्हटले आहे.

IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात चाललंय तरी काय? मोहम्मद नबीने शेअर केलेली इन्स्टा स्टोरी केली डिलीट, काय आहे कारण?
salman khan steps out of bandra home a day after gunfire incident
Video : घरावर झालेल्या गोळीबारानंतर पहिल्यांदाच बाहेर पडला सलमान खान, गॅलेक्सी अपार्टमेंटजवळचा व्हिडीओ व्हायरल
Mumbai Indians Gives Hint of Returning Suryakumar Yadav in IPL 2024 With Video
IPL 2024: सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात परतणार, MI ने व्हीडिओ शेअर करत दिले संकेत
IPL 2024 Lucknow Mumbai Indians vs Rajasthan Royal Match Updates in Marathi
IPL 2024 MI vs RR: इरफान पठाणने नाव न घेता पंड्याला सुनावलं, मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतरचं ट्विट होतंय व्हायरल

‘बॉम्बवर लिहिलेल्या संदेशामागील भावना समजून घेण्यासारख्या आहेत. अशा प्रकारचे संदेश लिहिणे, हा ब्रिटिश हवाई दलाचा इतिहास आहे,’ अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे. आत्मघातकी हल्लेखोर सलमान अबेदीने मँचेस्टरमधील अरियाना ग्रँडेच्या कॉन्सर्टदरम्यान घातपाती हल्ला केला होता. मागील आठवड्यात करण्यात आलेल्या या हल्ल्यात २२ लोकांचा मृत्यू झाला होता, तर ११९ लोक जखमी झाले होते. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये लहानग्यांचादेखील समावेश होता.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेकडून जपानवर टाकण्यात आलेल्या बॉम्बवरदेखील अशाच प्रकारे संदेश लिहिण्यात आला होता. जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बरवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेने प्रत्युत्तर म्हणून जपानवर हल्ला केला होता. त्यासाठी वापरण्यात आलेल्या बॉम्बवर जपानसाठी मजकूर लिहिण्यात आला होता.