उत्तर प्रदेशातील लखीमपूरखीरी गावात घडलेल्या घटनेत एका साठ वर्षीय महिलेला विवस्त्र करून गावातून फिरवण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. सदर महिलेचा मुलगा गावातील एका मुलीबरोबर पळून गेला, त्यानंतर मुलाच्या आईला विवस्त्र करून मुलीच्या कुटुंबियांनी गावभर फिरवल्याची माहिती पोलिसांनी दिली. तिच्या तोंडाला काळे फासून गुप्तांगावर मिर्ची पावडर टाकण्यात आली होती. तिच्या नवऱ्याने गावातील लोकांकडे मदतीसाठी धाव घेतली असता, पोलिसांना बोलवण्यात येऊन तिची सुटका करण्यात आली. महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
याविषयी अधिक माहिती देताना वरिष्ठ पोलीस अधिकारी अखिलेश चौरसिया म्हणाले की, मुलगा रविवारी ज्या मुलीबरोबर पळून गेला तिच्या घरच्यांनी या मुलाच्या आईवर हल्ला केला. दोन्ही कुटुंबिय एकाच गावात राहणारे असून, याप्रकरणी चार महिलांसह पाच जणांविरुद्धा गुन्हा नोंदविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.