उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाच्या एका कार्यकर्त्याला पोलिसांकडून जबर मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झाला आहे. ही मारहाण नेमकी कोणत्या कारणावरुन झाली हे अद्याप स्पष्ट झाले नसले, तरीही पोलिसांबाबत यामुळे उलटसुलट चर्चा सुरू आहे.

व्हिडिओमध्ये ही मारहाण पोलीस ठाण्यात झाल्याचेही दिसते आहे. एका पोलिसाने या कार्यकर्त्याला धरुन ठेवले आहे तर दुसरा काठीने त्याच्या पायावर जोराने मारत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

याबाबत ‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार बदायू जिल्ह्यामध्ये ही घटना घडली. मुलायम सिंह युथ ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष स्वाले चौधरी यांना ही मारहाण झाली आहे. चौधरी यांच्यावर अनेक आरोप करुन कारागृहात भरती करण्यात आले आहे. असा आरोप पक्षाने पोलिसांवर केला आहे.

[jwplayer 9xaU4cUi-1o30kmL6]

यासंदर्भात मारहाण करण्यात आलेल्याने तक्रार केल्याने संबंधित पोलीस निरीक्षकाला निलंबित कऱण्यात आल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांनी सांगितले. अशाप्रकारे पोलिसांकडून होणारा अन्याय पुन्हा एकदा समोर आल्याने पोलीस यंत्रणा आणि राजकीय वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.