रिक्षा चालकाने भाडे नाकारण्याचा प्रकार नाही नवीन नाही. रिक्षा चालकाने भाडे नाकारल्यानंतर आपण पोलिसात तक्रार करु, अशी ताकीद देऊन पाहातो किंवा त्याच्याशी वाद घालत बसण्यापेक्षा इच्छित ठिकाणी पोहोचणे महत्त्वाचे असल्याने दुसरी रिक्षा शोधण्याशिवाय गत्यंतर नसते. मात्र, भारतात पर्यटनासाठी आलेल्या सी. क्रिस्टिन फेअर या अमेरिकन तरुणीने हैदराबादमध्ये एका रिक्षाभाडे नाकारणाऱया रिक्षा चालकाला चांगलीच अद्दल घडवली. हैदराबादमधील चारमिनार येथे जाण्याचे रिक्षा चालकाने नाकारल्यानंतर क्रिस्टिन थेट रिक्षात ठाण मांडून बसण्याचा निर्णय घेतला. इतकेच नव्हे तर, तिने या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ शूट करण्याचे ठरविले आणि मोबाईलच्या कॅमेरात स्वत:च्या व्हाईसओवरसह व्हिडिओ चित्रीत करणे सुरू केले. पुढे तिने आपण पूर्ण दिवसभर रिकामटेकडे असल्याने संपूर्ण दिवसभर रिक्षात बसण्याचा निर्धार केला असल्याचे रिक्षा चालकाला सांगितले. एवढ्यावर न थांबता जर कोणी प्रवासी आलाच तर आपण गाणे म्हणून त्याचे मनोरंजन करु, असे सांगत क्रिस्टिन हिंदी चित्रपटातील गाणी गाण्यास सुरूवात करते. अखेर ही काही आपला पिच्छा सोडणार नाही, असे रिक्षा चालकाच्या ध्यानी येताच तो ‘किधर जाना है आपको?’ म्हणत रिक्षा सुरू करतो आणि रिक्षा मार्गस्थ होते.
काही दिवसांनंतर क्रिस्टिनने भाडे नाकारणाऱया रिक्षा चालकांना कशी अद्दल घडवावी या शिर्षकाखाली हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडिओने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.