वाहन चालकाला वाहतुकीचे नियम हे पाळावेच लागतात. पण नुसते वाहतुकीचे नियम पाळून चालत नाही तर वाहन चालकाला काही कायदेशीर कर्तव्ये दिली आहेत. त्यांचा धावता आढावा आपण आज घेणार आहोत. मोटार वाहन अधिनियम, १९८८ मध्ये कलम ११२ ते १३३ मध्ये ही कायदेशीर कर्तव्ये दिली आहेत आणि जर या कर्तव्यात कसूर केली तर त्या बाबत चालकावर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जातो. तर या लेखात आपण काही महत्वाची कायदेशीर कर्तव्ये पाहू.
* कलम ११२ नुसार कोणत्याही वाहन चालकाने आपले वाहन हे सार्वजनिक ठिकाणी कायद्याने आखून दिलेल्या किमान व कमाल वेगाच्या मर्यादेतच चालवण्याचे बंधन आहे.
* कलम ११३ नुसार मालवाहतूक करणारे वाहनाच्या बाबतीत किती वजनाचा माल वाहून न्यायाचा याचे बंधन टाकले आहे. तसेच प्रवासी वाहतूक करणारे वाहन हे माल वाहतूक करण्यासाठी बंधन घालण्यात आले आहे.
* कलम ११९ नुसार प्रत्येक वाहन चालकाने केंद्र व राज्य सरकारने ठरवून दिलेले वाहतुकीचे नियम व संकेत पाळण्याचे बंधन टाकण्यात आले आहे.
* कलम १२० मध्ये डाव्या बाजूला स्टेअिरग असणारे वाहन चालवण्यास बंधन टाकण्यात आले आहे.
* कलम १२२ नुसार वाहन चालकाने वाहन तसेच वाहनाचा कोणताही भाग हा सार्वजनिक ठिकाणी धोकादायक पद्धतीने ठेवणे वा पार्क करणे की ज्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अडचणी, धोका व गरसोय होईल अश्या पद्धतीने कोणतेही कृत्य करू नये असे बंधन टाकण्यात आले आहे.
* कलम १२३ मध्ये कोणत्याही वाहनचालकाने वाहनाचे बॉनेट वा टपावरून अथवा इतर कोणत्याही भागावर माणसांना बसवून धोकादायकरित्या प्रवास करण्यावर बंधन घालण्यात आले आहे.
* कलम १२५ मध्ये वाहनचालकाला अडथळा उत्पन्न होईल अश्या पद्धतीने लोकांना चालकाच्या शेजारी उभे व बसण्यास बंधन घातले आहे.
* कलम १२६ मध्ये धोकादायकरित्या सार्वजनिक ठिकाणी वाहन पार्क करण्यावर बंधन टाकण्यात आले आहे. तसेच वाहन चालकाने याचीही दक्षता घेणे आवश्यक आहे की, पार्क केलेले वाहन वाहनचालकाच्या गरहजेरीत चुकून चालू होणार नाही अथवा त्याला चुकून गती प्राप्त होणार नाही.  
* कलम १२८ नुसार दुचाकी वाहनावर दोनपेक्षा जास्त व्यक्तींनी प्रवास करण्यावर बंधन आहे.
* कलम १२९ नुसार हेल्मेट अथवा संरक्षक उपाययोजना अवलंबन करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.
* तसेच कलम १३०,१३३,१३४ नुसार अपघाताच्यावेळी वा आपत्कालीन परिस्थितीत वाहन थांबवणे, संबंधित कागदपत्रांची माहिती देणे तसेच वाहन चालकावर अपघाताची खबर देणे वगरे कर्तव्ये लादण्यात आली आहेत.
वर नमूद महत्वाची कर्तव्ये योग्य प्रकारे पार पाडली नाहीत तर मात्र कर्तव्यात कसूर केल्याबद्दल संबंधित व्यक्तींवर कारवाई केली जाते. अशा प्रकारे वर नमूद कर्तव्ये ही प्रत्येक व्यक्तीस माहीत असणे हे अत्यंत आवश्यक आहे. व ही कर्तव्ये माहिती नाहीत असा कायद्याने कोणालाही बचाव घेता येत नाही हे न्यायव्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे.

tax harvesting in marathi
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय? त्याचा वापर कसा कराल? केव्हा टाळाल?
nagpur, polling station,
मतदान केंद्रावरील कर्मचारीच म्हणतो, बोटाला शाई कशाला हवी?
Government Initiatives For Women's Safety
महिलांनो, तुमच्या सुरक्षेसाठी सरकारचे ‘हे’ उपक्रम ठरतात फायदेशीर; आपत्कालीन परिस्थितीत ही यादी जवळ ठेवाच!
Upsc Preparation Legislature Judiciary in Indian Polity Paper of Civil Services Pre Exam
upsc ची तयारी: भारतीय राज्यव्यवस्था; कायदेमंडळ, न्यायमंडळ, पंचायती राज