स्वयंरोजगारातून विकासाची कास धरणाऱ्या महिला बचत गटांना मुद्रा बँक योजनेतून कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी यांनी बुधवारी केली. यावेळी त्यांनी शासन आणि नारीशक्ती यांनी एकत्र येऊन प्रगतीची एक नवी दिशा समाजाला द्यावी असे आवाहनही केले.  डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे कृषी विज्ञान केंद्र आणि महिला आíथक विकास महामंडळ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त तळसंदे येथे महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी जिल्ह्य़ातील साडेतीन हजार महिला उपस्थित होत्या. मेळाव्याचे उद्घाटन सनी यांनी केले. यावेळी डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, यशस्विनी महिला सबलीकरण फौंडेशनच्या अध्यक्षा  राणी पाटील, डॉ. नितीन मार्कंडेय, नंदू नाईक, जिल्हा समन्वय अधिकारी, महिला आíथक विकास महामंडळ बाळासाहेब िझजाडे, जिल्हा माहिती अधिकारी वर्षां पाटोळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ जयवंत जगताप, बँक ऑफ महाराष्ट्रच्या व्यवस्थापक पूजा दिवाण यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

कर्जाची परतफेड करण्याचे प्रमाण महिला बचत गटांमध्ये ९९ टक्के असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून डॉ. सनी म्हणाले, फलोत्पादन अभियान जिल्हा व पशुधन योजनेतून ग्रामीण भागातील बचत गटांना विकासाचे नवे दालन खुले झाले आहे. बचत गटांच्या उत्पादित मालाच्या विक्रीसाठी जिल्ह्य़ाच्या ठिकाणी मॉल उभारणीबाबतही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. संजय डी. पाटील यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून महिलांना कृषी व दुग्धव्यवसायाबाबत सर्वतोपरी मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाईल.  इंजिनिअिरगसाठी व डिप्लोमासाठी जिल्ह्य़ातील पाच मुलींना मोफत प्रवेश देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

mumbai municipal corporation, transparent administration
मुंबई महापालिकेचा कारभार पारदर्शी होणार? नागरिकांशी संवाद, संपर्क वाढविण्याचे मनपा आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आवाहन
pune election duty marathi news, pune election training marathi news
पुणे : निवडणूक प्रशिक्षणाला गैरहजर; पाच हजार कर्मचाऱ्यांवर कारवाई, जिल्हाधिकाऱ्यांची स्पष्टोक्ती
bus
जिल्हाधिकाऱ्यांनी अडीच हजार वाहने घेतली ताब्यात
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना

बाळासाहेब िझजाडे यांनी जिल्ह्य़ात सुमारे २ हजार बचत गटांच्या माध्यमातून ३३ महिलांचे संघटन करून त्यांना सक्षम करण्याचे काम माविमच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे सांगितले. प्रास्ताविक जयंत जगताप यांनी केले. रेखा दावणे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सुधीर सूर्यगंध यांनी केले. शेषराव ससाणे यांनी आभार मानले.