बास्केटबॉलमध्ये गुणवत्तेबरोबर उंचीही महत्त्वाची असते. सात फूट लांब लाभलेला भारतीय वंशाचा सिम भुल्लर यंदा नॅशनल बास्केटबॉल लीगमध्ये खेळला असून प्रशिक्षकांच्या सल्ल्यामुळे बचावपटू झालो, असे मत त्याने व्यक्त केले.
‘‘मला प्रशिक्षकांनी एकदा सांगितले की, सर्वानाच आघाडीपटू होऊन गुण कमावण्यामध्ये रस असतो. पण बचावपटूंच्या जोरावर संघ विजय मिळवत असतात. त्यामुळे तुझे शरीर पाहता तू बचावपटू व्हावेस, असे सांगितले होते. त्यांच्या या सल्ल्याचा मला चांगलाच फायदा झाला आहे,’’ असे भुल्लर
म्हणाला.