भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि अष्टपैलू कपिल देव यांच्या नंतर भारतीय संघाला मिळालेल्या निधड्या छातीचा जलदगती गोलंदाज झहीर खानचा आज वाढदिवस आहे. कपिल देव यांच्यानंतर प्रतिस्पर्धी खेळाडूंना धास्ती वाटावी, अशी धार त्याच्या गोलंदाजीत होती. जवागल श्रीनाथच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाचा तो प्रमुख गोलंदाज होता. भारतीय संघाने मुंबईतील वानखडेच्या मैदानावर श्रीलंकेला पराभूत करुन दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला. या विजयात झहीरचा मोलाचा वाटा होता.

१.   झहीर खानचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील एका मराठी मुस्लीम कुटुंबात झाला.
२.  आपल्या गोलंदाजीने फलंदाजांची भंबेरी उडवणारा झहीर विमानातून प्रवास करण्यास घाबरत होता. मुंबईकडून रणजी सामन्यात निवड           झाल्यानंतर मध्य प्रदेशला रवाना होताना तो प्रचंड घाबरला होता.
३.  मुंबईकडून मैदानात उतरण्यापूर्वी तो बडोद्याच्या संघातून अनेक सामने खेळला होता.
४. अनेक क्रिकेट चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करणारा झहीर सचिनला आपले प्रेरणास्थान मानतो. याशिवाय तो टेनिस खेळाडू रॉजर                 फेडररचा मोठा चाहता आहे.
५. झहीरला त्याचे मित्र आणि संघातील सहकारी जॅकी नावाने हाक मारत.
६. फिरकीपटू अनिल कुंबळे, कपिल देव आणि हरभजन सिंग यांच्यानंतर भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा झहीर चौथा गोलंदाज आहे.
७. २०११ च्या विश्वचषकात २१ बळी मिळवत त्याने भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाट उचलला होता.
८. त्याने विश्वचषकात सर्वाधिक ६४ विकेट्स घेतल्या आहेत.
९. ग्रॅमी स्मिथ, कुमार संगकारा, सनथ जयसुर्या आणि मेथ्यू हेडन या धमाकेदार फलंदाजांना झहीरने १० पेक्षा अधिकवेळा तंबूचा रस्ता                     दाखवला आहे.
१०. दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथला झहीरने तब्बल १४ वेळा बाद केले आहे.