23 September 2017

News Flash

कोट्यवधी रुपयांची ऑफर कोहलीने नाकारली

सॉफ्ट ड्रिंकची जाहीरात करणार नाही - कोहली

लोकसत्ता टीम | Updated: September 14, 2017 4:51 PM

विराट कोहली (संग्रहीत छायाचित्र)

सचिन तेंडुलकर असो अथवा विराट कोहली, भारताचे बहुतांश क्रिकेटपटू हे एखाद्या उत्पादनाची जाहिरात करतात. या जाहिराती क्रिकेटपटूंच्या उत्पन्नाचे मोठे साधन आहे. भारताचा कर्णधार विराट कोहलीली सध्याच्या घडीला अनेक उत्पादनांची जाहिरात करतो. मात्र, नुकतीत कोहलीने एका सॉफ्ट ड्रिंक कंपनीकडून आलेली कोट्यवधी रुपयांची ऑफर नाकारल्याचे वृत् आहे. ‘द हिंदू’ या वृत्तपत्राने यासंदर्भात माहिती दिली आहे.

अवश्य वाचा – विराट कोहली म्हणतो, आताच्या मुलांचा ‘तो’ सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे

जी गोष्ट मी स्वतः पीत नाही, त्याची जाहिरात करणं मला योग्य वाटतं नाही. निव्वळ ती जाहिरात करण्यासाठी मला करोडो रुपये मिळतायंत, म्हणून जी गोष्ट मी स्वतः टाळत आलोय त्याची जाहीरात करणं, मला कधीही मान्य नसल्याचं कोहलीने म्हटलंय. कोहली आपल्या फिटनेसबद्दल प्रचंड जागरुक आहे. मैदानात फिट राहण्यासाठी दररोज व्यायाम आणि संतुलित आहार या सवयी कोहली आतापर्यंत कटाक्षाने पाळत आलेला आहे.

अवश्य वाचा – विराटचा फिटनेस फंडा जाणून घ्यायचाय, मग हा व्हिडिओ पाहाच

लहानपणी मी देखील सॉफ्ट ड्रिंकसाठी वेडा होतो. मात्र, जेव्हा तुम्ही आंतराष्ट्रीय पातळीवर एखाद्या देशाचं प्रतिनिधित्व करत असता, तेव्हा फिटनेस लेवलच्या दृष्टीकोनातून सॉफ्ट ड्रिंक घेणं योग्य नाही. कोणत्याही क्रीडा अकादमीच्या कँटीनमध्ये खेळाडूंना सॉफ्ट ड्रिंक दिलं जात नाही, असे सांगत कोहलीने ही जाहिरात नाकारण्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली.

अवश्य वाचा – ….तर आणखी १० वर्ष खेळेन – विराट कोहली

याआधीही भारतीय बॅडमिंटन संघाचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी अशाच प्रकारे कोट्यवधी रुपयांची जाहिरातीची ऑफर नाकारली होती. आज सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधूसारख्या खेळाडू काही प्रमाणात सॉफ्ट ड्रिंकच्या जाहिराती करतात. मात्र, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचं कोहलीने म्हटलंय. मात्र, मी जेव्हा कधीही या खेळाडूंना भेटतो, त्यावेळी त्यांना सॉफ्ट ड्रिंक न घेण्याचा सल्ला देत असतो.

First Published on September 14, 2017 3:38 pm

Web Title: indian cricket team captain virat kohli denies a multi crore soft drink advertisement offer
 1. A
  Ameya
  Sep 14, 2017 at 5:53 pm
  अरे वाह, हे बरे आहे, इतकी वर्षे पेप्सी ची जाहिरात केली, आता एकदम उपरती झाली. याला म्हणतात १०० चुहे खा के हज को चली नसेल करायची जाहिरात तर खुशाल नाकारावी, पण उगाच मोठेपणा मिरवण्यासाठी अशा बाता तरी मारू नयेत. अनेक वर्षे पेप्सीच्याच जीवावर कोट्यावधी कमावले आहेत त्याचे काय? ज्यांना खात्री करून घ्यायची असेल त्यांनी खालील लिंकवर जाहिरात पाहावी s: /watch?v fnib3y_QOBw s: /watch?v B4i1Bu0w6pk
  Reply
  1. P
   Prasad
   Sep 14, 2017 at 5:18 pm
   करोडो मिळवले आहेत . आता नौटंकी सुचली .
   Reply
   1. A
    Amol Devarkar
    Sep 14, 2017 at 4:43 pm
    खूप छान विराट.
    Reply
    1. V
     vinod
     Sep 14, 2017 at 4:31 pm
     भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद..!!!! लै भारी...:)
     Reply
     1. R
      Ravi D
      Sep 14, 2017 at 4:08 pm
      विराट तू खरंच खूप ग्रेट काम केलास. आता बुलीवूड अक्टर्सने फैर्नेस क्रीम आणि साबणाची ads कारण सोडून द्यावे. सॅल्यूट तो युअर एथिसिस अँड डे ेशन टोवॉर्ड्स फिटनेस.
      Reply
      1. P
       Pankaj Mahajan
       Sep 14, 2017 at 3:52 pm
       भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद ??????
       Reply
       1. M
        Max
        Sep 14, 2017 at 3:42 pm
        मित्रा दारूची जाहिरात करतो ते कितपत योग्य!!!!!!!!
        Reply
        1. Load More Comments