ठाणे महापौर वर्षां मॅरेथॉन  स्पर्धा

‘परिसर स्वच्छ ठेवू, आरोग्यासाठी धावू’ हा संदेश देत संततधार पावसातही २२,६३८ स्पर्धकांच्या सहभागामुळे ठाणे महानगरपालिकेतर्फे आयोजित केलेली ठाणे महापौर वर्षां मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. २१ किमी अंतराच्या पुरुष गटात पुण्याच्या एलआयसी ऑफ इंडियाचा कालिदास हिरवेने एक तास ७ मिनिटे आणि ४ सेकंदांमध्ये या स्पध्रेचे अंतर कापून अजिंक्यपद पटकावले, तर १५ किमी अंतराच्या महिला गटात नाशिकच्या संजीवनी जाधवने ५३.५६ मिनिटे अशा वेळेसह जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. पुरुषांमध्ये दुर्गा बहादूर बुधा (सेनादल क्रीडा संस्था, पुणे) आणि महिलांमध्ये नाशिकच्या मोनिका आथरेने उपविजेतेपद पटकावले.

Ruturaj Gaikwad's second century in IPL
IPL 2024 : ऋतुराज गायकवाडने झळकावले ऐतिहासिक शतक, CSK साठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
Mr. Gay Nepal 2024
‘मिस्टर गे नेपाळ २०२४’ चा किताब लक्ष्मण मगर यांनी जिंकला; आता लंडनमध्ये करणार प्रतिनिधित्व
sachin tendulkar finance marathi news
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर क्रिकेटपटू की कलाकार?
Top 5 Oldest Player To Score A Century In IPL
IPL 2024 : रोहित शर्मासह ‘या’ पाच सर्वात वयस्कर खेळाडूंनी आयपीएलमध्ये झळकावलयं शतक, जाणून घ्या कोण आहेत?

या स्पध्रेला नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक स्पध्रेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी धावपटू ललिता बाबर आणि नौकानयनपटू दत्तू भोकनळ उपस्थित होते.

सविस्तर निकाल –

  • २१ किमी (पुरुष) : १. कालिदास हिरवे, २. दुर्गा बहादूर बुधा, ३. पवन वामन देशमुख.
  • १५ किमी (महिला) : १. संजीवनी जाधव, २. मोनिका आथरे, ३. ज्योती चव्हाण.
  • १० किमी गट (पुरुष) : १. अश्विनी कुमार, २. मोरगा विठ्ठल, ३. पाराजी गायकवाड.
  • १० किमी (१८ वर्षांखालील मुले) : १. दिनेश म्हात्रे, २. रोहित काळेकर, ३. राहुल सूर्यवंशी.
  • ५ किमी (१५ वर्षांखालील मुले) : १. रोहिदास मोरगा, २. दिनेश पाठारे, ३. शशिकांत चव्हाण.
  • ५ किमी (१५ वर्षांखालील मुली) : १. दीक्षा सोनसुरकर, २. अश्विनी मोरे, ३. प्राजक्ता शिंदे
  • ३ किमी (१२ वर्षांखालील मुले) : १. कल्पेश गायकर, २. ब्रिजेश चौहान, ३. रविरंजन विनोद यादव.
  • ३ किमी (१२ वर्षांखालील मुली) : १. परीना खिल्लारी, २. यज्ञिका दळवी, ३. भाविका शिंदे