पाकिस्तानच्या संघात फार कमीच शिक्षित खेळाडू आहे, बऱ्याच खेळाडूंचे योग्य शिक्षण झालेले नाही, असे विधान पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे (पीसीबी) अध्यक्ष शहरयार खान यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. या विधानावर संघातील खेळाडू नाराज असल्याचे समजते. मोहम्मद हफिझचा अपवाद वगळता एकाही खेळाडूने खान यांच्या विधानावर जाहीररीत्या नाराजी व्यक्त केली नाही. याप्रकरणी हफिझ म्हणाला, ‘‘एक कसोटीपटू असल्याचा मला अभिमान आहे व माझ्यासाठी हीच पदवी आहे. आयुष्यात शैक्षणिक पदव्या मिळवून काही होत नसते, तर आपण त्यामधून काय शिकतो, हे महत्त्वाचे असते. त्यामुळे शिक्षण हे कुठलेही असो ते नेहमीच महत्त्वाचे असते.’’