आयपीएल संपल्यानंतर मिळालेल्या काही दिवसांच्या सुटीत टीम इंडियाचा अष्टपैलू सुरेश रैना पत्नी प्रियांकासोबत पॅरिसमध्ये हनिमूनसाठी दाखल झाला आहे. पॅरिसमध्ये पत्नी प्रियांकासोबत फेरफटका मारतानाचा सेल्फी रैनाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. पॅरिसमध्ये प्रियांकासोबत सुटीचा आनंद घेत असल्याचे रैनाने म्हटले आहे.
एप्रिलमहिन्याच्या पहिल्या आठवड्यात रैनाचा आपली बालपणीची मैत्रिण प्रियांकासोबत दिल्लीच्या एका आलिशान हॉटेलमध्ये विवाह झाला होता. मात्र, त्यानंतर आयपीएलच्या व्यस्त वेळापत्रकामुळे रैनाला पत्नी प्रियांकासाठी वेळ देता येत नव्हता. अखेर आयपीएल संपल्यानंतर रैना सुटीचा आनंद घेण्यासाठी प्रियांकाला पॅरिसमध्ये घेऊन गेला आहे. या सुटीनंतर रैना त्वरित टीम इंडियाच्या बांगलादेश विरुद्धच्या मालिकेसाठी रवाना होणार आहे. येत्या 18 जून रोजी बांगलादेश विरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना रंगणार आहे.