स्वस्त, मजबूत आणि टिकाऊ अशी ओळख असलेल्या शिओमी फोनने अल्पावधितच मोबाईल जगतात राज्य करायला सुरूवात केली. त्यातून भारतीय बाजारातपेठेत शिओमीला मोठी मागणी ग्राहकांकडून मिळताना दिसत आहे. नुकताच शिओमीनं आपला 5A फोन चीनमध्ये लाँच केला असून या फोनला किमान आठ दिवस तरी चार्जिंग करण्याची गरज भासणार नाही असा दावा कंपनीने केला आहे.

पाच इंचाचा डिस्प्ले, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४२५ प्रोसेसर २ जीबी रॅम , १६ जीबी इंटरनल स्टोअरज या फोनमध्ये असणार आहे. ही मर्यादा १२८ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. १३ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा या फोनमध्ये देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पॅनोरमा मोड, बर्स्ट मोड, फेशिअल रिकग्नेशन यासारखे अनेक फीचर या फोनमध्ये आहेत. प्लॅटिनम सिल्व्हर, चेरी पाऊडर, शॅम्पेन गोल्ड अशा विविध रंगामध्ये हा फोन उपलब्ध आहे.

वाचा : भारतीय वंशाच्या मुलांची प्रेरणादायक कामगिरी, दीड वर्षांत झाला कोट्यधीश

हा फोन तुर्तासतरी चीनमध्ये उपलब्ध आहे, या फोनची किंमत साधरण ६ हजारांच्या आसपास असल्याचे म्हटलं जातं आहे. गेल्याच आवड्यात शिओमीने आपला MI Mix 2 हा फोन भारतात लाँच केला. ५.९९ इंच आकाराच्या स्क्रीनसह या फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर देण्यात आला आहे. १२ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा फीचर्स असलेल्या या फोनची किंमत ३० हजारांच्या आसपास आहे.