मोबाईलच्या कंपन्यांमध्ये सध्या भलतीच स्पर्धा चालू आहे. प्रत्येक कंपनी ग्राहकांना आकर्षित कऱण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान, त्याच्या अॅक्सेसरीज, किंमती यांबाबत ऑफर्स देताना दिसत आहेत. ऑनलाईन खरेदीसाठी असणारे पोर्टल्सही यामध्ये मागे नाहीत. अॅमेझॉन या जगातील सर्वात मोठ्या ऑनलाईन कंपनीने ग्राहकांना आकर्षित कऱण्यासाठी नुकत्याच आपल्या नवीन ऑफर्स जाहीर केल्या आहेत. त्यामुळे जर तुम्ही नवीन मोबाईल घेण्याचा विचार करत असाल तर या ऑफर्सचा नक्की विचार करा. आज (२२ जून रोजी) हा सेल असल्याचे अॅमेझोनने जाहीर केले आहे.

यामध्ये अॅपल, सॅमसंग, वनप्लस, कूलपॅड, मोटोरोला आणि इतर काही ब्रॅंडच्या हॅंडसेटवर ऑऱर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. साधारण ऑफरबरोबरच एक्सचेंज ऑफर, कॅशबॅक आणि नो कॉस्ट ईएमआय यांसारख्या विशेष ऑफरही देण्यात आल्या आहेत. याबरोबरच अॅमेझॉन सेलमधून आपल्याला मोबाईल डेटाही मिळू शकणार आहे. कोणत्या मोबाईलवर कोणत्या ऑफर आहेत पाहूया…

आयफोन ७
या सेलमध्ये आयफोन ७ च्या विविध मॉडेलची किंमत कमी करण्यात आली आहे. ३२ जीबीचा आयफोन ७ ग्राहकांना ४२,९९९ रुपयांना उपलब्ध होणार आहे. तर १२८ जीबीचा ५२,९८७ आणि २५६ जीबीचा ६४,८०० रुपयांना खरेदी करता येणार आहे. या सवलतीशिवाय आयफोन ७ च्या तिन्ही म़ॉडेलवर ११, ०८२ रुपयांची एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे.

आयफोन ६ आणि आयफोन ६ एस

आयफोनचे नव्याने आलेले मॉडेल महाग वाटत असेल तर तुम्ही आयफोन ६ आणि आयफोन ६ एस या दोन्ही मॉडेलचा विचार करु शकता. आयफोन ६ चा ३२ जीबीच्या फोनची किंमत २६,९९९ रुपये इतकी आहे मात्र अॅमेझॉनच्या सेलमध्ये हा फोन २५,४९९ रुपयांना उपलब्ध होणार आहे. तर आयफोन ६ एस हा ३२ जीबीचा फोन ३६,९९९ रुपयांचा फोन ऑफरमध्ये ३४,९९९ रुपयांना मिळणार आहे. त्यामुळे या फोनवर थेट २ हजार रुपयांची सूट मिळणार आहे. शिवाय या फोनवरही ११,०८२ रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळू शकते.

मोटो एक्स फोर्स

या फोनवर अॅमेझॉनने सर्वात मोठी सूट दिली आहे. मोटो एक्स फोर्सचा ६४ जीबीचा फोन २२ हजार रुपयांच्या सूटने १५,९९९ रुपयांना उपलब्ध होणार आहे . याशिवाय ११,०८२ रुपयांची एक्सचेंज ऑफरही मिळणार असल्याने ही ग्राहकांसाठी अतिशय मोठी ऑफर ठरु शकते. फेब्रुवारी २०१६ मध्ये आलेल्या या फोनचा डिस्प्ले कॉंक्रीटच्या स्लॅबवर पडल्यावरही तुटतच नसल्याचा कंपनीचा दावा आहे.

वन प्लस ३ टी
या फोनच्या किंमतीवर कोणतीही सूट देण्यात आली नसली तरीही ११,०८२ रुपयांची एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळे २९,९९९ रुपयांचा हा फोन १८,९१७ रुपयांना उपलब्ध होणार आहे. या फोनचे १२८ जीबीचे मॉडेल आऊट ऑफ स्टॉक आहे. त्यामुळे ग्राहकांना केवळ ६४ जीबीचे मॉडेल घेता येणार आहे.