केंद्र सरकारचा मानस

केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्य़ात किमान एक आयुष रुग्णालय आणि योगा स्वास्थ्य केंद्र उभारणीचा मानस असून या अनुषंगाने प्रत्येक राज्यातूनदेखील या प्रस्तावाला मागणी असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य आणि उपकेंद्रातदेखील किमान एका आयुषच्या डॉक्टरांचे पथक ठेवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे आयुषचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी स्पष्ट केले आहे.

condition of primary health centers in state is pathetic beds in rural hospitals are utilized only at 40 percent capacity
राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांची अवस्था दयनीय, ग्रामीण रुग्णालयांतील खाटांचा वापर केवळ ४० टक्के क्षमतेनेच
Engineer bribe Dhule district
धुळे जिल्ह्यात ग्रामसेविकेसह अभियंता लाच स्वीकारताना जाळ्यात
government employees free ration marathi news
सरकारी बाबूंनाही मोफत धान्याचा मोह! रायगडात १ हजार ६५६ सरकारी बाबूंनी घेतला मोफत धान्य योजनेचा लाभ, चौकशी समितीचे गठन
Shramjivi organization
ठाणे : पाणी प्रश्नावरून श्रमजीवी संघटनेचे ग्रामपंचायतींवर मोर्चे, रिकामे हंडे घेऊन अधिकाऱ्यांना विचारला जाब

विविध राज्यांतून यासंबधीच्या प्रस्तावाला मागणी वाढत असून अनेक राज्यांनी याबाबतची उत्सुकताही दर्शिवली आहे. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्य़ात किमान एक तरी योग स्वास्थ्य केंद्राची उभारणी करावी, याबाबतची चाचपणी केंद्राकडून सुरू आहे.

आतापर्यंत केंद्राकडे १४ राज्यांनी याबाबत प्रस्ताव पाठवले असून येत्या दोन ते तीन महिन्यांतच एआयआयएमएसप्रमाणेच केंद्र सरकार ऑल इंडिया आयुर्वेद केंद्राचीदेखील उभारणी करणार आहे. याशिवाय ऑल इंडिया इन्स्टिटय़ुट फॉर युनानी आणि ऑल इंडिया इन्स्टिटय़ुट फॉर होमिओपथी उभारण्यासाठीच्या भूखंडालाही मान्यता देण्यात आली आहे.

केंद्र सरकारने युनानी केंद्रासाठी गाजियाबाद आणि नारेला येथील भूखंड आरक्षित केलेला आहे.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)