आपल्या हृदयाचे आरोग्य आणि रोगप्रतिकारकशक्ती आपल्या उत्साही आणि उदंड आयुष्यासाठी महत्त्वाची ठरते. त्यामुळे ती जास्तीत जास्त वाढवणे आपल्या हातात पर्यायाने आहारात असते. दिसायला छोटय़ा पण त्याहीपेक्षा कैक पटीने अधिक गुणधर्मानी परिपूर्ण असणाऱ्या ‘क्रॅनबेरीज’ म्हणजे हृदयासाठी वरदान.

अमेरिकेतल्या टफ्ट विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार ‘क्रॅनबेरीज’ हे छोटे व लाल भडक रंगाचे फळ खाल्ल्याने तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारतेच, पण तुमची रोगप्रतिकारकशक्तीही वाढते. बेरी म्हणजेच छोटय़ा गटातल्या फळांच्या यादीत ‘क्रॅनबेरीज’ हे फळ आरोग्यासाठी सर्वाधिक ऊर्जावर्धक आहे. इतकेच नव्हे तर हे फळ पित्तशामक व चयापचय क्रिया सुधारणारे आहे. याशिवाय शरीरातीतल स्निग्धता आणि कबरेदकांमध्ये समन्वय साधण्याचे कामही हे फळ करते. फक्त हृदयरोगासाठी याचे कार्य मर्यादित नसून सुकवलेली ‘क्रॅनबेरीज’ मधुमेह आटोक्यात ठेवण्यास मदत करते. असे हे लहान मूर्ती असलेले पण महान कीर्ती असलेले ‘क्रॅनबेरीज’.

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
How Suryanamaskar and pranayama help to fight allergies
तुम्हाला वारंवार ॲलर्जी होते? सूर्यनमस्कार आणि प्राणायाम ठरतील फायदेशीर
gut health diet
आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी ‘या’ बाबी आवश्यक; अन्यथा पोटाची दुर्दशा

‘‘क्रॅनबेरीज हे फळ अतिशय पौष्टिक आहे. हृदय बळकट करण्यासाठी आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी ते नियमित खाणे आवश्यक आहे,’’ असे टफ्ट विद्यापीठातील आरोग्यतज्ज्ञ जेफरी ब्लमबर्ग यांनी सांगितले.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)