हल्लीच्या जमान्यात मोबाईल ही अनेकांच्यादृष्टीने मुलभूत गरज झाली आहे. त्यामुळे मोबाईलचे फायदे, त्याचा दैनंदिन जीवनातील उपयोग आणि समस्या यांवर अनेकदा चर्चाही होते. यामध्ये मोबाईल फोनची लवकर उतरणारी बॅटरी हा मुद्दा हमखास चर्चेत असतो. ऑफिसमध्ये, प्रवासात किंवा एखाद्या समारंभात असताना मोबाईलची बॅटरी डाऊन झाल्यानंतर अनेकांची चीडचीड होते. त्यामुळे मोबाईलची बॅटरी वाचवण्यासाठी कायमच निरनिराळ्या युक्त्या लढवल्या जाताना दिसतात. यापैकी

आपण वेगवेगळ्या कारणांसाठी मोबाईलमध्ये काही अॅप्लिकेशन्स डाऊनलोड करतो. यातील काही आपल्या नियमित उपयोगाची असतात तर काही आपल्याला क्वचितच उपयोगी पडतात. मात्र, यातील काही अॅप्लिकेशन्समुळे आपल्या मोबाईलची बॅटरी लवकर उतरते हे लक्षात घ्यायला हवे. हे ओळखण्याचे काही उपाय आहेत. पाहुयात काय आहेत हे उपाय…

* सेटींग्जमध्ये जाऊन बॅटरीच्या पर्यायावर क्लिक करा. आता यामध्ये बॅटरीशी निगडीत सर्व सेटिंग्ज दिसतील. यामध्ये कोणत्या अॅप्लिकेशनसाठी मोबाईलची किती बॅटरी खर्ची होत आहे तेही दिसेल.

* सेटींग्जमध्ये आपल्या मोबाईलच्या सध्याच्या डिस्प्लेमुळे आपली किती बॅटरी खर्च होत आहे तेही आपल्याला दिसेल. याशिवाय कॉलिंगमुळे किती बॅटरी खर्च झाली आणि सिस्टीमसाठी किती बॅटरी खर्च झाली याचीही पूर्ण माहिती या ठिकाणी मिळू शकेल.

* आता कोणते अॅप्लिकेशन जास्त बॅटरी खर्च करत आहे, हे समजल्यानंतर त्याचे कारण तुम्हाला शोधता येईल.

* एखाद्या अॅपमुळे बॅटरी जास्त खर्च होत असेल तर प्लेस्टोअरमध्ये जाऊन ते अॅप्लिकेशन अपडेट झालेले नाही ना हे तपासून पहावे. संबंधित अॅप अपडेट नसेल तर मोबाईलची बॅटरी लवकर उतरण्याची शक्यता असते.
* काही अॅप्लिकेशन्स आपण विशिष्ट कालावधीसाठी आवश्यक असतात म्हणून डाऊनलोड करतो. मात्र, त्यानंतर त्याचा फारसा उपयोग नसतो. अशी अॅप्लिकेशन्स वेळीच डिलीट करावीत. त्यामुळे मोबाईलचा वेग वाढतो.

* याशिवाय अॅप्लिकेशन्सच्या नोटिफिकेशन्समुळेही जास्त बॅटरी खर्च होते. ज्या अॅप्लिकेशन्सची नोटिफिकेशन्स गरजेची नाहीत त्याच्या सेटिंग्जमध्ये जाऊन नोटिफिकेशनचा पर्याय बंद करावा.