अंड्यांमधील अनेक घटक हे आरोग्य चांगले राखण्यासाठी उपयुक्त ठरतात. अंड्यातील पोषणमुल्ये आणि त्याच्यापासून पटकन कोणताही पदार्थ तयार करता येणे शक्य असल्यामुळे डॉक्टरांकडून नेहमीच आहारात अंड्यांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. केवळ उत्तम चवीसाठीच नाही तर अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने आणि जीवनसत्त्वे असतात. याशिवाय, इतर पोषक खाद्यपदार्थांच्या तुलनेत अंडी स्वस्त असतात. मानसी जैन यांनी आरोग्यासाठी अंडी कशाप्रकारे उपयुक्त ठरू शकतात, याबाबत नेमके काय सांगितले आहे पाहूया…

अतिशय उपयुक्त पोषणमूल्ये

Yoga for a healthy liver: Here are 3 asanas that work
यकृत निरोगी ठेवण्यासाठी ‘ही’ योगासने फायदेशीर; जाणून घ्या करण्याची सोपी पद्धत
tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
Do not come to ask for votes placards from onion growers in Malwadi
मत मागण्यासाठी येऊ नये, माळवाडीत कांदा उत्पादकांकडून फलक

शरीर सुदृढ राहण्यासाठी आवश्यक असणारी अनेक जीवनसत्त्वे अंड्यातून मिळतात. अंड्यामध्ये फोलेट म्हणजेच अ, ब १२ ब ५ आणि ब २ ही जीवनसत्त्वे असतात. याबरोबरच फॉस्फरस, सेलेनियम, कॅल्शियम, ओमेगा ३ आणि इतर अनेक महत्त्वाचे घटक असतात. त्यामुळे तंदुरुस्तीसाठी दररोज एक अंडे खाणे अतिशय आवश्यक आहे.

मोठ्या प्रमाणात कोलेस्टेरॉल

अंड्यामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असले तरीही त्याचा शरीरावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. कोलेस्टेरॉलमधील अनेक घटक आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. आहारात अंड्याचा समावेश केला तरीही शरीरावर किंवा रक्तातील कोलेस्टेरॉलवर त्याचा परिणाम होत नाही. विशेष म्हणजे यामुळेच मधुमेह असणाऱ्यांनाही डॉक्टर अंडी खाण्याचा सल्ला देतात.

डोळ्यांसाठी फायदेशीर

अंड्यामध्ये ल्यूटीन आणि झिझेन्थिन ही दोन अँटी ऑक्सिडंटस असतात. हे दोन्हीही घटक उत्तम दृष्टीसाठी अतिशय आवश्यक असतात. अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये हे घटक समाविष्ट असल्याने बलक खाणेही तितकेच गरजेचे असते. मोतीबिंदू आणि रेटिनाच्या समस्या उद्भवू नयेत, यासाठी हे दोन्हीही अँटी ऑक्सिडंटस आवश्यक असतात.

हृदयरोग कमी होण्यास उपयुक्त

अंडी खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो. ज्यांना मधुमेह असतो त्यांना हृदयरोगाचा धोका जास्त असतो. मात्र, अंडी खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका वाढतो, असे कोणत्याही निरीक्षणात आढळून आलेले नाही. त्यामुळेच हृदयरोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी अंड्यांचा आहारातील समावेश उपयुक्त ठरतो.

वजन कमी होण्यास मदत

अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असल्याने अंडी खाल्ल्यास बराच वेळ भूक लागत नाही. अंड्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि सातत्याने खाण्यावर नियंत्रण येते. त्यामुळे जास्त कॅलरीज निर्माण होत नाहीत तर त्या वापरल्या जातात. त्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.