मातांना अधिक शिक्षित केल्याने आघाडीच्या जैववैद्यकशास्त्रातील लसीच्या तुलनेत मलेरिया या विषाणूवर मात करता येणे शक्य असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

कॅनडातील अल्बर्टा विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत अधिक संशोधन केले. यासाठी दोन महिने पाच वर्षांच्या ६४७ मुलांची तपासणी करण्यात आली. याबाबत सर्वेक्षणही करण्यात आले.

यामध्ये मुलांच्या आईवडील तसेच पालकांकडून लोकसंख्याशास्त्र, सामाजिक स्थिती, मातृशिक्षण, बेड नेटचा वापर आणि अलीकडील तापामुळे आलेले आजारपण याबाबत प्रश्न विचारून सर्वेक्षण करण्यात आले.

सहभागी झालेल्यांमध्ये ज्या मुलांच्या माता अधिक शिक्षण घेतलेल्या होत्या, त्यांच्या मुलांना मलेरिया होण्याचे प्रमाण अतिशय कमी असल्याचे संशोधकांना दिसून आले. हा काही साधा परिणाम नाही. आईच्या शिक्षणाचा प्रचंड प्रभाव पडत असून, आईच्या शिक्षण घेण्यामुळे जैववैद्यकशास्त्रातील लसीच्या तुलनेत मलेरिया विषाणूवर अधिक प्रभावीपणे मात करता येणे शक्य असल्याचे, अल्बर्टा विद्यापीठातील साहाय्यक प्राध्यापक मायकल हॉक्स यांनी सांगितले. ६४७ मुलांपैकी १२३ मुलांना संशोधनामध्ये मलेरिया आढळून आला. मलेरिया होणाऱ्या मुलांच्या मातांना कसलेही शिक्षण नसल्याचे प्रमाण ३० टक्के होते.

जर मातांना प्राथमिक शिक्षण असेल तर मलेरिया होण्याचे प्रमाण हे १७ टक्क्यांनी कमी होत असून, त्यापेक्षा अधिक शिक्षण असेल तर तरुण मुलांमध्ये मलेरिया होण्याचे प्रमाण अधिक कमी होत असल्याचे संशोधकांना दिसून आले.

मुलांना मलेरियापसून वाचविण्यासाठी मातांना खूप काही शिक्षण देण्याची आवश्यकता नाही. मुलांचा डासांपासून बचाव होण्यासाठी आवश्यक असणारी जाळी वापरल्यास आणि ताप होण्यापासून काळजी घेतल्यास मलेरिया होण्यापासून बचाव होऊ शकतो, असे अल्बर्टा विद्यापीठातील विद्यकीय शिक्षण घेणाऱ्या कॅरी मा यांनी म्हटले आहे. हा अगदी थेट आणि सोपा संदेश असून, योग्य आरोग्य आणि स्वच्छता ठेवण्यासाठी प्राथमिक शिक्षण आवश्यक असून, यामुळे विविध आजारांना दूर ठेवण्यास मदत होत असल्याचे, संशोधकांनी सांगितले.