दिवसभर अभ्यास , काम, नोकरी असे सगळे चांगल्या पद्धतीने करायचे असल्यास शरीरात ताकद असणे गरजेचे असते. आता शरीरात ताकद असणे म्हणजेच स्नायू मजबूत असणे. यासाठी चांगले खाल्ले तर स्नायूंमध्ये ताकद राहील ना. नाहीतर आपण दिवसभराची कामे कशी करणार. तर स्नायूंमध्ये शरीराला आवश्यक असणारी ताकद टिकून रहावी यासाठी काही पदार्थांना आहारात समावेश असणे अतिशय आवश्यक आहे. यातही आपण प्रोटीन योग्य प्रमाणात घेत आहोत ना हे पहाणे जास्त महत्त्वाचे आहे. आहारात योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेटस आहेत ना याची खात्री करुन घेणे महत्त्वाचे आहे. हे पदार्थ रात्री झोपायला जाण्यापूर्वी खाल्ल्यास जास्त चांगले. याबरोबरच ६ ते ८ तासांची गाढ झोपही तितकीच महत्त्वाची असते. झोपायला जाण्यापूर्वी प्रोटीन्स घेतल्यास त्याचा स्नायूंमधील ताकद वाढण्यासाठी चांगला उपयोग होतो. ही प्रोटीन्स झोपेदरम्यान शरीरात ऊर्जा निर्माण कऱण्याचे काम करतात. कोणत्या गोष्टी झोपायला जाण्यापूर्वी खायला हव्यात त्याविषयी…

१. पनीर

f you're watching your blood sugar levels, you might want to keep an eye on how much bread you're pairing with your eggs
अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग
heatwave heat, people of mumbai, summer season, Citizens, vomiting, dizziness, diarrhea
उष्णतेमुळे मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; नागरिक उलटी, चक्कर व अतिसाराने हैराण
High Blood Pressure Cases, High Blood Pressure Rising in india, 4 out of 10 Patients Not Checking, Patients Not Checking Regularly, high blood pressure unhealthy lifestyle, smoking,
१० पैकी ४ रूग्णांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यास टाळाटाळ! अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका…
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन

पनीरमध्ये असणारे प्रोटीन शरीरासाठी अतिशय उपयुक्त असते. स्नायूंना आवश्यक असणारे अमिनो अॅसिड पनीरमधून मिळते. पनीरमध्ये असणाऱ्या कॅल्शिअममुळे हाडे बळकट राहण्यासही मदत होते.

२. योगर्ट किंवा दही

योगर्ट आणि दही या पदार्थांमध्येही प्रोटीन आणि कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असते. याचा शरीरातील चरबी न वाढता केवळ ताकद वाढण्यासाठी उपयोग होतो.

३. ग्रील्ड फीश

माश्यामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन्स असतात. याबरोबरच ओमेगा ३ चे प्रमाणही जास्त असते. अनेकांमध्ये ओमेगा ३ फॅटसची कमतरता आढळून येते. या लोकांसाठी ग्रील्ड फीश हा दिर्घकालिन आणि उत्तम उपाय असतो. त्यामुळे झोपण्यापूर्वी १ तास आधी मासा खाल्लेला आरोग्यासाठी चांगले असते.

४. चिकन सॅलाड

चिकन तूप किंवा सॅलाडसोबत खाल्ल्यास पनीरपेक्षा लवकर पचते. या चिकनमधून मोठ्या प्रमाणात मिळणारे अमिनो अॅसिड रात्रभर स्नायूंना ताकद पुरवते. यामुळे स्नायू बळकट होण्यास मदत होते.

५. पिनट बटर आणि व्हे प्रोटीन

जिममध्ये जाणाऱ्यांसाठी व्हे प्रोटीन हे मुख्य अन्न असू शकते. हे स्वस्त आणि बाजारात सहज उपलब्ध होणारे आहे. व्हे प्रोटीनमध्ये असणाऱ्या अमिनो अॅसिडमुळे स्नायूंना ताकद मिळण्यास मदत होते. तुम्हाला शरीरावरील चरबी वाढवायची असल्यासही व्हे प्रोटीनचा उपयोग होतो. यामध्ये साधे पिनट बटर किंवा फ्लेवर्ड पिनट बटर एकत्र केल्यास त्याची चव वाढण्यास तर मदत होतेच पण स्नायू बळकट होण्यामध्येही त्याचा फायदा होतो.